पावसाळ्यातील आहार

अंगाची काहिली करणारा उन्हाळा संपून आता पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळी पिकनिक, पावसात भिजणे, मसालेदार आणि चमचमीत खाणे अशा कार्यक्रमांना आता प्राधान्य दिले जाईल. मात्र हे करत असताना आपण सर्वानी आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. कारण पावसाळ्यातच विविध साथीचे आजार मोठ्या प्रमाणात डोके वर काढत असतात. पावसाळ्यापूर्वीच्या उन्हाळ्यामध्ये शरिरात कोरडेपणा आलेला असतो, शरिराची शक्ती न्यून झालेली असते. कडक उन्हानंतर वातावरणात अचानक पालट होऊन पावसामुळे गारठा निर्माण होतो. हवेतील आर्द्रताही वाढते. त्यामुळे शरिरातील वातदोष वाढतो. वातावरणात, विशेषतः वनस्पती, धान्ये, पाणी इत्यादी सर्वच ठिकाणी आम्लता वाढत असल्याने पित्त साचण्याकडे शरिराचा कल असतो. या दिवसांत पचनशक्तीही घटते. भूक मंदावल्यामुळे अपचनाचे विकार होतात. पावसाच्या पाण्यासह धूळ, कचरा वाहून आल्याने पाणी दूषित होते आणि तेही रोगनिर्मितीस कारण ठरते. या सर्व घडामोडींमुळे वाताचे विकार, उदा. संधीवात, आमवात यांसह जुलाब, अजीर्ण इत्यादी अपचनजन्य विकार बळावतात.

तसेच चमचमीत पण उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे किंवा पाण्यामुळेही पोट बिघडायला निमंत्रण ठरू शकते. कावीळ, विषमज्वर, हिवताप, कॉलरा, व्हायरल फिव्हर, गॅस्ट्रो असे अनेक आजार व साथीचे रोग या काळात होत असतात.

पावसाळ्यात आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी काय करता येईल, या काळात आपला आहार कसा असावा या बाबतची माहिती खास आपणासाठी …।

पावसाळ्यात काय खावे काय खाऊ नये ?

पावसाळ्यात जास्त गोड खाऊ नये. आंबट, तिखट ,कडू, तुरट खाल्ले तरी चालेल.
वात, पित्त आणि कफ वर्धक खाऊ नये उलट वात, पित्त आणि कफ शामक खावे .
पचनाला हलका, शक्तीदायक, शुष्क (कोरडा), आहार घ्यावा.
मूग, मसूर अशी कडधान्ये पचायला हलकी असतात त्यामुळे ती जास्त प्रमाणात खावीत चवळी, वाटाणा, पावटे,मटकी अशी धान्ये जास्त खाऊ नयेत .
पावसाळ्यात जास्त पालेभाज्या खाऊ नयेत. उलट दुधी, भेंडी, पडवळ, कोबी,
फ्लॉवर, श्रावणघेवडा, गवार, सुरण, माठ, वाल अशा भाज्या खाव्यात.
पावसाळ्यात मसाले घालून बनवलेली मूग, मसूर, तूर, चवळी या कडधान्यांची कढणे किंवा पाणी, टॉमेटोचे सार,
आमसुलाचे सार किंवा कढी . उष्ण (गरम) पदार्थ
उदा. फुलके, भाजलेला पापड खावेत.
पावसाळ्यामध्ये तूपाचा आहारात समावेश करणे चांगले असते. पावसाळ्यात वातदोषाचाप्रकोप होत असतो तर पित्ताचा संचय होत असतो. तुपामुळे पित्त, वात कमी होत असतेतसेच तुपामुळे अग्निवर्धनसुद्धा होते.
तळलेले पदार्थ पचण्यास जड असतात, पित्त वाढवत असल्याने तळलेले पदार्थ खाणेटाळावे.
पावसाळ्यात दही खाऊ नये, ब्रेड खाऊ नये.
डाळिंब, केळी, सफरचंद अशी फळे खावीत. फणसा सारखी फळे खाऊ नयेत.
सर्वात महत्वाचे म्हणजे पावसाळ्यात पाणी गाळून किंवा तुरटी फिरवून वापरावे. पाण्याचे निर्जंतुकीकरण व्हावे यासाठी ते चांगले उकळून वापरावे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu