फॅटी लिव्हरचे वाढते प्रमाण व प्रिव्हेंशन

फॅटी लिव्हरचे वाढते प्रमाण व प्रिव्हेंशन:

“आपल्याला फास्ट जीवनाची खूप सवय झाली आहे. फास्ट रिपोर्ट्स रिसल्ट्स, फास्ट ट्रॅव्हलिंग आणि फास्ट “फूड.” आपण विसरलो आहोत “क्वालिटी टेक्स टाईम .” आताच्या काळात होणारे जास्तीत जास्त रोग हे चुकीच्या जीवनशैलीचे परिणाम आहेत. ह्यापैकी सगळ्यात common दिसून येरणारा रोग म्हणजेच ‘फॅटी लिव्हर” किंवा लिव्हरला सूज येणे.”

फॅटी लिव्हर हे २ प्रकारचे असतात 
१. अल्कोहोलिक ( दारू पिणाऱ्या लोकांमध्ये आढळतो )
२. नॉन – अल्कोहोलिक (दारू न पिणाऱ्या लोकांमध्ये आढळतो )

नॉन – अल्कोहोलिक फॅटी लिव्हरची महत्त्वाची कारणे म्हणजे – चरबीयुक्त जेवण, बाहेरचे फास्ट फूड, तेलकट खाणे, परत-परत तळलेले तेल (काळे झालेले) वापरणे, लठ्ठपणा, डायबेटिस, व्यायामाचा अभाव इ.

अतिरिक्त तेलकट, बाहेरचे, फॅटी फूड खाऊन शरीरात जास्त प्रमाणात मुक्ताणु (free radicals ) निर्माण होतात. हे मुक्ताणु शरीरासाठी हानिकारक असतात. ह्यामुळे शरीरात oxidative stress निर्माण होतो. पुढे जाऊन हि चरबी लिव्हर मध्ये जमत जाते, लिव्हर ला सूज येते, लिव्हर मोठे होते व लिव्हरची काम करण्याची क्षमता कमी होते. ह्या आजाराचे रूपांतर पुढे लिव्हर सिर्र्होसीस मध्ये होऊ शकते ज्यावर अंतिम उपाय म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट. पण “नथिंग कॅन रिप्लेस द ओरिजनल बॉडी पार्टस ”

लिव्हर ला सूज येणे/फॅटी लिव्हर आणि पित्ताशयात खडे निर्माण होणे हे दोन आजार हल्ली पेशंट्समध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात. वयोगट ४०-५० यामध्ये फॅटी लिव्हर आढळून येते व ५०-६० दरम्यान सिर्र्होसीस. ह्या आजाराच्या सुरुवातीची लक्षणे म्हणजे उजव्या बसजुला पोटात दुखणे – अधून मधून आणि थकवा येणे. हे पेशंट्स लठ्ठ असून त्यांना डायबेटिस असतो असे आढळले आहे. पोटाची सोनोग्राफी करून ह्या आजाराचे डायग्नोसिस करता येते.

होमिओपॅथी मध्ये असले आजार थोपवता येतात जेणेकरून आजाराचे पुढील होणारे रूपांतर आणि कॉम्प्लिकेशन थांबवता येतील. मागील लेखात मी सांगितल्या प्रमाणे कोणत्याही प्रकारचा अतिरेक ह्याचे मूळ सायकॉसिस आहे, (Overgrowth , excess – sycosis ) ref : https://www.facebook.com/sharayu4health/posts/1009151239282156?__tn__=K-R

ह्या पेशंट्सना लहानपणापासून बारीक – सारीक पोटाच्या तक्रारी असण्याची शक्यता असते. पोटात पिळवटून दुखणे, कळ येणे व असे दुखत असताना पुढे वाकून (पोटाची घडी घालून) बसणे किंवा पोट चेपणे, पित्ताचा त्रास होणे, कावीळ होणे, गॅसेस अतिरिक्त निर्माण होऊन पोट फुगणे, छातीत आणि पोटात बेचैन वाटणे. पचनशक्ती कमकुवत असून खाण्यात काही बदल झाल्यास लगेच त्रास होणे व जरा चालून, हाल-चाल करून बरे वाटणे, पोटावर झोपण्याची सवय असणे, इ. गोष्टी आढळून येतात.

आता ह्या फॅटी लिव्हर वर उपाय म्हणजे आपली जीवनशैली बदलणे व समतोल आहार घेणे. ताज्या भाज्या, फळे, मोड आलेली कडधान्ये जेवणात जास्त घेणे. दिवसभरात निदान ६-७ प्रकारच्या (फळे + भाज्या) खाणे. जेवणात ३५-४०% चोथा (फायबर्स/ रेषा तत्व) असणे गरजेचे आहे. शरीराला जास्तीत जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स मिळायला हवेत ज्यामुळे मुक्ताणु कमी निर्माण होतील. नियमित व्यायाम – ( ४५ मिनिटे) रोज करायलाच हवा. शिळे, फ्रिजमधील, बाहेरचे जेवण टाळावे. मानसिक स्ट्रेस कमी करणे, डायबेटिस असल्यास साखर बंद करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित औषधे घेणे.

आपले आरोग्य आपल्या हातात आहे, त्याची काळजी घेतली पाहिजे व वेळीच आजारावर मात करायला पाहिजे . आपले आरोग्यच आपला प्रथम जोडीदार आहे हे नेहमी लक्षात ठेवा!

डॉ. शरयू राजवाडे : डाएट | फिटनेस | होमिओपॅथी 
मुंबई | पुणे. 
संपर्क: ८४२४८००२४७ 
Whatsapp for booking your appointment.
HIT LIKE AND FOLLOW ME @
Dr Sharayu R – Dr Sharayu R (y)

PC:google

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu