पार्ल्यात हेरिटेज वॉक
दिनांक ८ जानेवारी २०१७ रोजी सकाळी ८ वाजता सुरु होणारा हेरिटेज वॉक पार्लेकरांसाठी पार्ल्याचा इतिहास व येथील झाडांविषयी वैशिष्ठ्यपूर्ण व रंजक माहिती मिळवण्यासाठी एक उत्तम संधी असणार आहे. महात्मा गांधी रोड वरील राममंदिरापासून ते हनुमान रोड वरील दत्तमंदिरापर्यंत या वॉकचे आयोजन केले आहे. यात प्रथम नाव नोंदवणाऱ्या ३० लोकांनाच प्रवेश दिला जाईल.
मार्गदर्शक : वनस्पतीतज्ञ डॉ. चंद्रकांत लट्टू व पुरातत्त्वशास्त्र अभ्यासक श्री. संदीप दहिसरकर.
या कार्यक्रमासाठी शुल्क रु. १००/-
नोंदणीसाठी संपर्क : ९९३०७७४२४१