बदलणाऱ्या ऋतूत आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी हे नक्की वाचा !!

गणपती गेले कि नवरात्रीचे वेध लागतात. नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा उत्सव. नवरात्रीमध्ये स्त्रीशक्ती देवीच्या नऊ रूपांची उपासना, घट बसवणे, नवरात्रीचे उपवास, गरबा खेळणे असे अनेक जण करताना दिसतात. नवरात्रीचा उत्सव हा वाईट शक्तींवर चांगुलपणाचा विजय आणि सगळा कंटाळा, आळस सोडून धडाडीने कार्यरत होण्याचा संकेत ह्याचे प्रतिक आहे.
साधारणतः ऑक्टोबर महिन्याच्या जवळपास नवरात्री सुरु होतात. पावसाळा संपून उन्हाळा असा ऋतूपालट आपल्याला ह्या काळात दिसून येतो. ह्या काळात आरोग्याची काळजी घेणे फार महत्वाचे असते. कारण आपले शरीर ह्या ऋतूपालटशी जुळवून घेत असते. पावसाळा, गणपती अशा  सगळ्या सबबींखाली आपण जो व्यायाम आणि योग्य आहाराला विसरलेलो असतो तो पुन्हा सुरु करायचा हा काळ.
अचानक हवेत उन्हाळा सुरु झाल्यामुळे शरीराला पचायला सोपे पडेल असे हलके पदार्थ खावेत. ह्या काळात उपास असो अगर नसो तरीही फळे, कंदमुळे जसे  रताळे, शहाळ्याचे पाणी, हिरव्या पालेभाज्या, काकडी, दुध, दही ह्यांचा आहारातील समावेश वाढवावा.ह्या पदार्थातून शरीराला उपयुक्त विटामिन, खनिज, उर्जा ह्यांचा छान पुरवठा होतो पण शरीतातीत उष्णता वाढत नाही. भरपूर पाणी प्यावे. किमान ३ लिटर पाणी रोजच्यारोज शरीरात जाणे गरजेचे आहे.
तेलकट, अतिगोड, अतितिखट, मांसाहारी, उष्ण पदार्थ टाळावेत.
रोज व्यायामाला साधारण १ तास वेळ काढावा. व्यायाम करण्यासाठी फार खर्चिक काहीही करण्याची गरज नाही. इतर सर्व गोष्टी बाजूला ठेऊन जर तुम्ही घराच्या आजूबाजूला एका ठराविक वेगाने सतत एक तास चालत राहिलात तरी त्याचा उपयोग शरीराला व्यायाम म्हणून होतो. पण ह्या एक तासात तुम्हाला तुमच्या फोनला बाजूला ठेवणे फार गरजेचे आहे. अनेक पेशंट मला सांगतात की  “चालतानाच तर आम्हाला आमचा आमचा एक तास मिळतो. तर आम्हाला गाणी ऐकायची असतात. दिवसभरात जमा झालेले मेसेज वाचायचे असतात. काही फोन करायचे असतात. तेव्हा फोन न घेता एक तास कसे चालायला जाणार?”
तर हाच मुद्दा आहे, तुम्ही व्यायाम म्हणून चालताना इतर काही ही  न करणे गरजेचे आहे. नाहीतर गाण्यांच्या लयीप्रमाणे चालण्याचा वेग बदलत राहतो आणि शरीराला त्याचा पुरेसा उपयोग होते नाही. मेसेज वाचत, फोनवर बोलत चालण्याने देखील तसाच परिणाम होतो. खरे तर चालणे किंवा कोणताही व्यायाम करणे हे फक्त शरीरासाठी नाही तर मनासाठी देखील तितकेच महत्वाचे असते. व्यायामामुळे आपल्या शरीरात असे काही CHEMICAL आणि होर्मोन तयार होतात ज्यांना ‘हैपी होर्मोन’ म्हणतात ज्यामुळे मूड छान होतो, काम करण्याची क्षमता वाढते. 
skin careतसेच ह्या काळात त्वचेची आणि केसांची नीट काळजी घेणे देखील फार महत्वाचे असते. उन्हात बाहेर जाताना छत्री, स्कार्फ वापरा. आपल्या चेहऱ्याची त्वचा शरीराच्या त्वचेपेक्षा नाजूक असल्यामुळे त्याची जास्त काळजी घेणे गरजेचे असते. त्यामुळे SUNSCREEN LOTION चा वापर करा. तसेच चेहरा दिवसातून ३-५ वेळा थंड पाण्याने धुवा.
तसेच केसांची काळजी घेण्यासाठी केस थंड पाण्याने आठवड्यातून २-३ वेळा धुवा. उन्हाळ्यात रोज केस धुण्याची इच्छा झाली तरी तसे करू नका त्यामुळे केसांचं नैसर्गिक तेल आणि MOISTURE निघून जाते.
चेह्र्याप्रमाणेच पाउलाच्या त्वचेची काळजी घेणेदेखील गरजेचे आहे. कारण सततच्या धूळ, माती, उष्णता ह्याच्या माऱ्यामुळे पाउलाची त्वचा कोरडी पडते. त्यामुळे न विसरता MOISTURIZER चा वापर करा.
अश्यातऱ्हेने आज पासून सुरवात केलीत तर नवरात्रीसाठी तुम्ही छान तंदुरुस्त आणि सुंदर तयार होऊ शकता.

ह्या काही सोप्या टिप्स चा वापर करून तुम्ही नवरात्र खऱ्या अर्थाने वाईट सवयींवर उत्तम सवयींचा विजय मिळवून साजरी करू शकाल.

– डॉ. अस्मिता सावे.
[ होमेओपाथ, आहारतज्ञ, आक्युप्रेशर थेरापिस्त, रेकी मास्तर.]
म्यानेजिंग डायरेक्टर,
रीजोईस वेलनेस प्रा. लि.
Advertisement : 
 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu