‘नवरी सजली’मध्ये लग्नासाठी लागणार्‍या सर्व गोष्टी एकाच छताखाली 

 लग्न हा प्रत्येकाच्य आयुष्यातला जिव्हाळ्याचा विषय. शिवाय लग्न म्हणजे एक दिवसाचा निव्वळ सोहळा नसून साखरपुड्यापासून सुरू होणार्‍या अनेक सोहळ्यांची मालिका असते. मुंबईच्या फास्ट लाईफमध्ये लग्न सोहळ्यातील बारीकसारीक गोष्टीचे नियोजन करण्यात प्रत्येकाची दमछाक होते. यावर उपाय म्हणून मुंबईमध्ये विलेपार्ले येथील परांजपे हॉलमध्ये ‘साजिरी सारीज’ने २६ मे रोजी ‘नवरी सजली’ या एकदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.   ‘नवरी सजली’मध्ये साखरपुडा, हळद, सीमांतपूजन, संगीत आदी प्रसंगांत लागणार्‍या विविध प्रकारच्या साड्या, वधूचा शेला, वराचा फेटा, रुखवत, मेकअप, ब्युटिशियन, बांगड्या भरणारे कासार, छायाचित्रकार, सनई-चौघडे वाजंत्री अशा सर्व गोष्टी एकाच छताखाली उपलब्ध असतील.
अधिक माहितीसाठी ‘साजिरी’च्या संस्थापिका दीपा चेउलकर यांना ९८६७०८८८७७ वर संपर्क करू शकता.

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu