जागतिक योगदिनाच्या निमित्ताने कार्यक्रम – संकल्प सूर्यनमस्कारांचा 21st June 2019

दि 21 जून हा #विश्व योग दिवस आणि *समर सोलस्टाईस डे* म्हणजेच वर्षातला सर्वात मोठा दिवस म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे.

योग दिवसाचे तसेच शारीरिक स्वास्थ्याचे महत्व सर्वांपर्यंत पोहचावे या हेतूने #शुक्रवार दि 21 जून 2019 या दिवशी जनसेवा समिती #संकल्प सूर्यनमस्कारांचा हा एक आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करीत आहे.

आपल्या कार्यकर्ते, मित्रपरिवार, सुहृद आणि हितचिंतकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन या दिवशी जास्तीत जास्त सूर्यनमस्कार घालावेत असा हा आपला संकल्प आहे.

#आपण या उपक्रमात कश्या प्रकारे आपला सहभाग देऊ शकता?

आपण 21 जून या दिवशी खाली दिलेल्या वेळेत आणि स्थानावर आपल्या सोयीस्कर वेळी येऊन सूर्यनमस्कार घालावायचे आहेत.

आपण जितके सूर्यनमस्कार त्यावेळी घालाल त्याची नोंद केली जाईल.

या उपक्रमात सूर्यनमस्काराची आपण कोणतीही ‘लक्ष्य संख्या’ ठरवलेली नसली तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येत भाग घेऊन आणि जास्तीत जास्त सूर्यनमस्कार घालून हा उपक्रम यशस्वी करावा अशी आपली कल्पना आहे.

विलेपार्ले, अंधेरी किंवा या परिसराच्या बाहेर राहणारे अथवा मुंबई बाहेर राहणाऱ्या व्यक्तींनाही यात सहभागी होता येईल. त्यांनी फक्त एकच करायचे आहे.

आपापल्या ठिकाणी उपरोक्त दिवशी सूर्यनमस्कार घालून आम्हाला ती संख्या कळवायची आहे.

हा सांघिक उपक्रम असल्याने यात सहभाग नोंदवणाऱ्या प्रत्येक नागरिकाने घातलेल्या सूर्यनमस्कारांची संख्या एकत्रित केली जाणार आहे.

#संकल्प सूर्यनमस्कारांचा
#शुक्रवार दि 21 जून 2019

#सूर्यनमस्कार घालण्याची वेळ*-

#सकाळी 5.30 ते सकाळी 8.30 आणि सायंकाळी 5.30 ते रात्रौ 8.30 पर्यंत

#सूर्यनमस्कार घालण्याचे ठिकाण-

#कॅ विनायक गोरे व्यायामशाळा, वामन मंगेश दुभाषी ग्राउंड (प्ले ग्राउंड), नेहरू रोड पेट्रोल पंपाच्या मागे, विलेपार्ले पूर्व

#विशेष सूचना#

ज्येष्ठ नागरिक देखील या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. त्यांच्यासाठी खुर्चीत बसून सूर्यनमस्कार कसे घालावेत याचं मार्गदर्शन करणारे स्वयंसेवक असतील.

उपक्रमात भाग घेण्यासाठी खालील लिंक वर उपलब्ध असलेला online फॉर्म भरणे गरजेचे आहे.

#ऑनलाइन नोंदणीसाठी लिंक-

https://docs.google.com/forms/d/1mEcpz9Kzl8Wj0Sf5Dqj30rnug-HUb6oF9d-qGddTFeA  
हा उपक्रम कोणताही विक्रम अथवा लक्ष्य साध्य करण्यासाठी नसून योग साधनेचे महत्व सांघिक कृतीतून अधोरेखित व्हावे या हेतूने आयोजित केला आहे.

उपक्रम सर्वांसाठी खुला असून वयाची कोणतीही अट नाही!

अधिक माहितीसाठी संपर्क-

9757266114
9987565738  

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu