पार्ले कट्टा उपक्रमाचे नवीन सत्र ४ नोव्हेंबर २०१७ पासून सुरु
४ नोव्हेंबर २०१७ पासून पार्ले कट्टा उपक्रमाचे नवीन सत्र सुरु होत आहे. या वेळचे प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध वकील श्री उज्वल निकम यांना आमंत्रित केले आहे. त्यांची मुलाखत वृत्तनिवेदिका शिबानी जोशी या घेतील.
या कार्यक्रमातील मुक्त व्यासपीठ या कार्यक्रमात सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आशिष देशपांडे हे पुढील विषयावर आपले मत व्यक्त करतील.
विषय : माणूस बुवाबाजीच्या मागे का लागतो ?
वेळ : संध्याकाळी ५. ३०
ठिकाण : साठ्ये उद्यान , मालवीय रोड , विलेपार्ले.
