पार्ले कट्ट्यावर श्री.प्रमोद लेले
शनिवार दि. 2 मार्चला पार्ले कट्टा उपक्रमात आपण भेटणार आहोत आरोग्यसेवा तज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते श्री.प्रमोद लेले यांना.
जॉन्सन अॅण्ड जॉन्सन, पार्क डेव्हिस, हिंदुजा हॉस्पिटल अशा प्रतिष्ठित आस्थापनांमध्ये उच्च पदांवर आपल्या कार्यकर्तृत्त्वाचा ठसा उमटवणाऱ्या श्री.लेले यांनी समाजसेवेचे ब्रीदही कायम जपले आहे. त्यांच्या पुढाकाराने साकारलेले टिटवाळा येथील महागणपती हॉस्पिटल हे त्याचे एक ठळक उदाहरण. पेशाने डॉक्टर नसतानाही आरोग्य सेवाव्रती पुरस्कार मिळवणाऱ्या ह्या पहिल्याच मानकऱ्याचा प्रेरणादायी प्रवास आणि विचार जाणून घेण्याची संधी पार्ले कट्ट्याच्या निमित्ताने चालून आली आहे.
त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधतील सुप्रसिद्ध उद्योजक आणि अर्थतज्ज्ञ श्री. दीपक घैसास.
मुक्त व्यासपीठामध्ये प्रसार माध्यमे व वाचन संस्कृती या विषयावर माध्यम तज्ज्ञ श्री.रविराज गन्धे आपले मनोगत सादर करतील.
वेळ -सायंकाळी 05:30वा स्थळ -साठे उद्यान, मालवीय-पार्क रस्ता चौक, शिवसेना शाखेसमोर. विलेपार्ले (पूर्व )
सर्वांना हार्दिक आमंत्रण.


