‘आम्ही पार्लेकर’चा वार्षिक विशेषांक २०२४ प्रकाशित!
‘आम्ही पार्लेकर’ च्या वतीने यंदाचा वार्षिक विशेषांक २०२४ वाचकांच्या भेटीला आला आहे. या विशेषांकाचे प्रकाशन करताना संपादक ज्ञानेश चांदेकर यांनी आपल्या सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
ह्या अंकात वाचकांसाठी विशेष आकर्षण म्हणजे ‘मल्टिमीडीया’ स्वरूपातील डिजिटल अंक. या तंत्रज्ञानामुळे वाचकांना हायपरलिंक्सच्या माध्यमातून महाजालात प्रवेश करता येणार असून विषयावरील अधिक माहिती, व्हिडिओ क्लिप्स यांचा आस्वाद घेता येणार आहे.
ज्ञानेश चांदेकर यांनी सांगितले की, “मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने आपल्या सर्वांना अभिमान वाटतो, आणि गेली ३३ वर्षे ‘आम्ही पार्लेकर’ ह्या भाषेच्या संवर्धनात छोटासा का होईना, आपला हातभार लागत आहे, ही आम्हा सर्व संपादक मंडळासाठी गौरवाची गोष्ट आहे.
वार्षिक अंक हा फक्त पार्लेकरांच्याच नव्हे तर समस्त मराठी माणसांच्या भावविश्वाशी संवाद साधणारा, नाते जोडणारा असावा ह्या विचाराने आम्ही विविध विषयांचा ह्या विशेषांकात सामावेश केला आहे. असा हा अनेक वाचनीय सदरांनी खच्चून भरलेला अंक आपल्या पसंतीस उतरेल ह्याची खात्री वाटते.”
‘आम्ही पार्लेकर’ चा हा अंक वाचकांना नक्कीच आवडेल, असा विश्वास संपादकांनी व्यक्त केला.
विशेषांक वाचण्यासाठी वाचकांनी ‘आम्ही पार्लेकर’च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. वेबसाईटवर अंक उपलब्ध असून खालील लिंकवर क्लिक करून अंकाचा लाभ घेता येईल.
👉 आम्ही पार्लेकर वार्षिक विशेषांक २०२४
सोबतच, अंकाविषयी प्रतिक्रिया किंवा चर्चेसाठी फेसबुक पेजवरही आपले मत नोंदवता येईल.
👉 फेसबुक लिंक
‘आम्ही पार्लेकर’ च्या वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा!


