लोकसभा निवडणूक २०१४ निकाल

१६व्या लोकसभेच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजल्यापासून सुरूवात झाली. यामध्ये महाराष्ट्रासह मुंबई आणि ठाणे येथे प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेसाठी ठाणे आणि कल्याण मतदारसंघातील लढती अत्यंत प्रतिष्ठेचा विषय बनल्या आहेत. त्यामुळे या मतदारसंघाचे निकाल काय लागणार याची मुंबईसह राज्यातील मतदारांना उत्सुकता लागून राहिली आहे.
विजयी उमेदवार
कल्याण मतदारसंघात शिवसेनेच्या डॉ. श्रीकांत शिंदे यांचा २,००,००० मताधिक्याने विजय
पालघर मतदारसंघातून भाजप उमेदवार चिंतामणी वणगा विजयी
दक्षिण मुंबई मतदारसंघात काँग्रेसचे मिलिंद देवरा पराभूत, शिवसेनेच्या अरविंद सावंत यांचा विजय
ठाणे मतदारसंघातून शिवसेनेचे राजन विचारे प्रचंड मताधिक्याने विजयी
उत्तर-पश्चिम मुंबईतून शिवसेनेचे गजानन किर्तीकर १,५०,००० लाख मतांनी विजयी
उत्तर-मध्य मुंबईतून काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा पराभव करत पुनम महाजन यांनी १,२५,००० मताधिक्याने विजय संपादन केला.
उत्तर-मुंबई मतदारसंघातून भाजपचे गोपाळ शेट्टी यांनी काँग्रेसचे संजय निरूपम आणि आम आदमी पक्षाच्या सतीश जैन यांचा पराभव करत तब्बल ३,००,००० मतांनी विजय संपादन केला. 
दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांनी काँग्रेसचे विद्यमान खासदार एकनाथ गायकवाड यांचा पराभव करत १,३८,०४६ मतांनी विजय मिळवला.
भिवंडी मतदारसंघातून भाजपचे कपिल पाटील विजयी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu