उपवन की उभं-वन
मुंबई येथील इरला नाल्याचं अत्यंत घाणेरडं रूप झाकण्यासाठी कडेकडेने संपूर्ण कुंपणावर काटकोनात वर चढत जाणारी एक बाग उभारण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे उभारण्यात येणारा हा मुंबईतला पहिलाच उपक्रम असावा.
फुलझाडांच्या अक्षरशः हजारो कुंड्या एकावर एक एखाद्या फुलपाखराच्या आकारात रचून, हिरव्या आणि जांभळ्या रंगांच्या जवळ जवळ ३००० फुलझाडांची रचना करण्यात आलेली आहे. अंधेरी येथील नगरसेवक श्री. अमित साटम यांच्या पुढाकाराने, शांघाय येथील एका उपक्रमाने प्रेरित होऊन, साधारणतः १५ लाख रुपये खर्चाने ही बाग फुलवण्यात आलेली आहे.
बहुतकरून अशा प्रकारचा हा देशातील ‘उभ्या-वनाचा’ पहिलाच प्रयत्न असावा, असे श्री. साटम यांचे म्हणणे आहे.
