नववर्ष स्वागत स्फूर्तीयात्रा -२०१६
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही जनसेवा समिती विलेपार्ले यांच्या तर्फे नववर्ष स्वागत स्फूर्तीयात्रा आयोजित करण्यात आली आहे. या वर्षीची संकल्पना सजग … सशक्त … सुसंकृत … सुरक्षित … स्वयंशिल समाज ! अर्थात – पार्लेकर समाज !! अशी आहे.
या वर्षी खास लोकाग्रहास्तव ही यात्रा ८ एप्रिल २०१६ रोजी गुढी पाडव्याच्या दिवशी संध्याकाळी आयोजित करण्यात आली आहे. सर्वस्पर्शी होण्यासाठी ५ दिशांतून एकाच वेळी ५ स्फूर्तीयात्रा निघांस्र निघणार असून सायंकाळी ५. ३० वाजता पार्लेश्वर चौकात एकत्र येउन त्याची महास्फूर्तीयात्रा तयार होईल . या महास्फुर्तीयात्रेचा मार्ग खालील प्रमाणे असेल.
पार्लेश्वर जैन मंदिर चौक – हनुमान रोड , रामभाऊ बर्वे मार्ग – उत्कर्ष चौक – दुभाषी मैदान येथे समारोप …
येथे दिलेल्या पत्रकात संपूर्ण माहिती दिली आहे .सर्व पार्लेकरांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन यात्रेची शोभा वाढवा


