अभिनव उपक्रम – पालक मैत्री
लोकमान्य सेवा संघ संस्थेच्या कृष्णाबाई खंबदकोण बालक पालक मार्गदर्शन केंद्रातर्फे ‘पालक मैत्री’ हा अभिनव उपक्रम चालू करण्यात येत आहे. या उपक्रमात समृध्द पालकत्वावर चर्चात्मक परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे. जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्यातील प्रत्येक शनिवारी संध्याकाळी ४ ते ६ ह्या वेळात हा उपक्रम आयोजिला आहे. संस्कार, आहार, मित्र, वेळ, अभ्यास, स्पर्धा इत्यादी विषयांवर ह्या कार्यक्रमात चर्चा होईल.
संपूर्ण कार्यक्रमाचे शुल्क १२०० रुपये आहे. एक दिवसीय परिसंवादाचे शुल्क १५० रुपये आहे.
आपल्याला ह्या उपक्रमात भाग घ्यायचा असेल तर श्रीमती संगीता परब यांच्याशी ०२२ – २६११७१९५ यावर संपर्क साधावा.
