कलादर्पण ,संवाद डॉक्टरांशी
कलादर्पण
रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वर यांच्या तर्फे दिनांक ४ व ५ फेब्रुवारी २०१७ रोजी सायंकाळी ४ ते रात्री ११ या वेळेत हेडगेवार मैदान , हनुमान रोड ,विलेपार्ले येथे ‘कलादर्पण’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमा दरम्यान चित्रकला , शिल्पकला , कॅलिग्राफी यांचे सादरीकरण तसेच ओडिसी , कथकली नृत्य , शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीताचे गायन व वादन असे कार्यक्रम सादर केले जातील.
शालेय विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विविध हस्तकला वस्तूंचे व चित्राचे प्रदर्शन भरवण्यात येईल. रविवारी सकाळी ११ पासून शालेय विद्यार्थी आणि कलाप्रेमींसाठी विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.
संवाद डॉक्टरांशी –
दिनांक ६ ते ११ फेब्रुवारी दरम्यान संवाद डॉक्टरांशी या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात मुंबईतील प्रख्यात डॉक्टर विविध रोगांसंबंधी माहिती देतील व उपस्थितांच्या शंकांचे निरसन करतील. कार्यक्रमाची वेळ सायंकाळी ७. १५ ते रात्री ९ अशी असेल. हे सर्व कार्यक्रम हेडगेवार मैदान, हनुमान रोड, विलेपार्ले येथे संपन्न होतील.
