लोकमान्य सेवा संघ , पार्ले आयोजित पुलोत्सव २०१६
विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघा तर्फे पु.ल.देशपांडे यांच्या जयंती निमित्त नोव्हेंबर महिन्यात साजरा केला जाणारा पुलोत्सव यंदा दिनांक १२ व १३ नोव्हेंबर २०१६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता संस्थेच्या पु.ल.देशपांडे सभागृहात साजरा करण्यात येणार आहे.
कार्यक्रम पुढील प्रमाणे असतील :
शनिवार १२ नोव्हेंबर २०१६
सायंकाळी ६.३० वाजता
भिन्न षड्ज – गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्यावरील लघुपट
स्वररचनांचे ललित – पु.ल. देशपांडे आणि किशोरीताईंनी स्वरबद्ध केलेल्या स्वररचना.
रविवार १३ नोव्हेंबर २०१६
नाटक – शांतता कोर्ट चालू आहे .
सर्व रसिकांना सस्नेह निमंत्रण !

