लोकमान्य सेवा संघ ,ग्राहक पेठ ऑक्टोबर २०१६

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही संस्थेची ग्राहक पेठ १४ ऑक्टोबर २०१६ ते २३ ऑक्टोबर २०१६ पर्यंत संपन्न होणार आहे. ग्राहक पेठेची वेळ सोमवार ते शुक्रवार दुपारी ३ ते रात्री ९ अशी असेल. व शनिवार रविवार सकाळी १० ते रात्री ९ अशी असेल. सावरकर पटांगण , गोखले सभागृह , पु.ल.देशपांडे व काळे सभागृह येथे शंभराहून अधिक गाळे आपल्या उत्पादनांची प्रदर्शन व विक्री करतील.

नवीन नवीन उद्योजकांना संधी देणे , त्यांच्या वस्तूंना एकत्रित ग्राहक पेठ उपलब्ध करून देणे, स्थानिक छोट्या उद्योजकांना वाव देणे हा संस्थेचा ग्राहक पेठ भरवण्यामागे मुख्य हेतू असतो. वनवासी कल्याण केंद्र , ऑटिझम संस्था , अपंग पुनर्वसन केंद्र काही अल्प उत्पन्न धारक अशांना
त्यांची उत्पादने विक्रीस ठेवण्यासाठी विनामूल्य किंवा सवलतीच्या भाड्याने गाळे उपलब्ध केले जातात.ग्राहकांना पावती दिल्याशिवाय गाळे धारकांना कुठलीही वस्तू विकता येत नाही. संपूर्ण सचोटीचा व्यवहार , युवा पिढीचा आक्रमक सहभाग व दृष्ट लागेल अशी सुरक्षा व्यवस्था अशा अनेकविध वैशिष्ट्यांनी सजलेली ग्राहक पेठ हि वर्षानुवर्षे पार्लेकरांची नव्हे तर उपनगरवासियांचे आकर्षण केंद्र बनली आहे याचा संस्थेस सार्थ अभिमान आहे.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu