साठ्ये कॉलेजमध्ये म्युझिअम बस – Museum on Wheels in Sathye College VileParle
दिनांक ९ सप्टेंबर २०१७ रोजी खास पार्लेकरांसाठी साठ्ये महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या पुढाकाराने पुन्हा एकदा म्युझिअम बस येणार आहे. ही म्युझिअम बस छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातर्फे सिटी इंडियाच्या सौजन्याने ‘म्युझिअम ऑन व्हील’ अशी खास बस तयार करण्यात आली आहे.
या म्युझिअम बसमध्ये यंदा पार्लेकरांना भारतीय इतिहासाशी संबंधित विविध नाणी व पुरातत्व वस्तू बघायला मिळतील. शिवाय सिंधू संस्कृतीवर एक छोटीशी फिल्मही दाखवली जाईल. इतिहास लेखनाच्या साधनाशी संबंधित एखाद्या विषयावर प्रात्यक्षिक आयोजित केले जाईल ज्यात दर्शकांनाही सहभाग घेता येईल.
या म्युझिअम बसची वेळ : दिनांक ९ सप्टेंबर २०१७ सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत
स्थळ : साठ्ये महाविद्यालय , विलेपार्ले (पू). मुंबई.
Museum on wheels in Pics :



PC : Unknown
Advertisements :



