हेल्दी दिवाळी !!!

दिवाळी आणि थंडी तश्या हातात हात घालूनच येतात. हल्ली मुंबईत फारशी थंडी पडत नाही हा भाग वेगळा. दिवाळी अगदी जवळ येऊन ठेपलीये आणि आता साफसफाई, खरेदी, फराळ बनवणे ह्या सगळ्याची एकत्रच झुंबड उडाली आहे. पण दिवाळी साजरी करण्यासाठी छान दिसणे, तब्येतीने ‘फिट’ असणे हे फार महत्वाचे. दिवाळी म्हणजे मित्रमैत्रिणी, नातेवाईक सगळे एकत्र भेटण्याचा काळ आणि मग खूप गोडधोड खाणे, पार्टी करणे, धमाल मस्ती करणे.

पण ह्या सगळ्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ नये म्हणून काही साधे सोपे उपाय आपण आज बघूया. कारण अश्या वेळी आरोग्याकडे स्वतःकडे थोडेसे का होईना दुर्लक्ष होऊ लागते.

Drinking waterसर्वात आधी दिवाळी सुरु होण्याच्या साधारण १५ दिवस आधी पासूनच तुमचे पाणी पिण्याचे प्रमाण किमान २ ग्लास म्हणजे अर्धा लिटरने वाढवा. दिवाळीची तयारी आणि मग दिवाळी दरम्यान होणारी धावपळ, प्रदुषण आणि खाण्यापिण्याची चांगळ ह्या मुळे शरीरातील toxins म्हणजे नको असलेली विषारी द्रव्य वाढतात. आणि मग त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर आणि त्वचेवर दिसू लागतो.

दिवाळीच्या दिवसात देखील भरपूर पाणी प्या. कमी पाणी पिण्यामुळे शरीरात शुष्कता [Dehydtration] निर्माण होते. त्यामुळे थकवा येणे, गळून गेल्यासारखे वाटणे, ताकद कमी झाल्यासारखे वाटणे हे होऊ लागते. आणि उर्जा कमी झाल्यामुळे गोड खाण्याची प्रबळ इच्छा निर्माण होते. हे सर्व टाळण्यासाठी लक्षात ठेऊन भरपूर पाणी पिणे चालू ठेवणे फार गरजेचे आहे.

पाण्याप्रमाणेच दिवाळीच्या १५ दिवस आधी पासून तुमचा रोजचा व्यायाम किमान १५ मिनिटांनी वाढवा. रोज व्यायाम केल्याने आपल्या मेंदूद्वारे अशी काही रसायने निर्माण केली जातात ज्याचा उपयोग फक्त शरीरालाच नाही तर मनाला उभारी देण्यासाठीदेखील होतो. ह्या रसायनामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, आपली स्मरणशक्ती तल्लख होते, आपल्या त्वचेचा तजेलदारपणा वाढतो.

दिवाळी म्हंटल कि गोडधोड आलेच. शक्यतो घरी बनवलेले गोडाचे पदार्थ खा. घरी गोड पदार्थ बनवताना नैसर्गिक गोडवा आणणाऱ्या गोष्टींचा वापर करा. साखरेऐवजी खजूर, मध ह्यांचा वापर वाढवा. अगदीच हवे तर गुळ वापरा. बाजारात मिळणारे ‘artificial sweetner’ नक्की टाळा, रिसर्चणे हे सिध्द केले आहे कि ह्या ‘sweetners’ मध्ये असलेल्या रसायनामुळे कॅन्सर , यकृत आणि मुत्राशायाचा बिघाड होण्याची शक्यता असते. डायबिटीस असणार्यांनी खास काळजी घेणे गरजेचे आहे.

मिठाया समोर आहेत म्हणून खाऊन संपवत बसू नका. जर गरजेपेक्षा जास्त मिठाया असतील तर त्या अश्या लोकांना वाट ज्यांना त्या मिळत नाहीत. दुसर्यांना आनंद देऊन ह्या वर्षीची दिवाळी जास्त चैतन्यमय बनवा.

गोडाबरोबर आपल्याला हवे असते काहीतरी चमचमीत, तिखट. ह्या आवडींची सरबराई करताकरता देखील आरोग्याची काळजी घेता येते. तिखट आणि चमचमीत चिवडा, चकल्या तळण्याआऐवजी bake करा किंवा airfry करा. नेहमीचे पदार्थ बनवतानाच ज्वारी बाजरी ओट्स अशी वेगवेगळी पीठ वापरून चकल्या, पुऱ्या बनवा ज्या जास्त आरोग्यदायक बनतील आणि चविष्ट देखील लागतील.

पार्टीला बाहेर जाण्याआधी काहीतरी पोषक खाऊन मगच बाहेर जा. एखादे फळ, सूप, सलाड खाऊन बाहेर गेले कि मग आपण पार्टीला असलेले जड, क्यालेरीयुक्त पदार्थ आपोआप कमी खातो.

दिवाळी पार्टी आणि मग त्यात मद्यपान हा प्रकार आजकाल फार सर्रास होताना दिसतो. पण लक्षात ठेवा मद्यपान आणि जड , क्यालेरीयुक्त अन्न ह्यामुळे शरीराचे metabolism कमी होते. तसेच मद्यपाना नंतर शुष्कता [ Dehydration] आणि थकवा वाढतो. तसेच शरीरावरील ताबा कमी झाल्यामुळे अपघात घडण्याची शक्यता वाढते. त्यामुळे दिवाळीसारख्या आनंदाच्या काळात शक्यतो मद्यपान टाळा.

दिवाळीनिमित्त भेटवस्तू देताना मिठायांऐवजी फळे किंवा सुकामेवा अश्या भेटी द्या. ज्यामुळे भेट स्वीकारणारा देखील खुश आणि त्यांची तब्येत देखील.

दिवाळी म्हणजे फटकेबाजी आलीच. त्यामुळे तुमचा जुजबी औषधांचा डब्बा हाताशीच असू द्या. फटक्यांमुळे हवा आणि ध्वनी प्रदुषण वाढते त्यामुळे अति फटाक्यांचा वापर टाळा. घरात जर हृदयविकाराचे किंवा उच्चरक्तदाबाचे रुग्ण असतील तर त्यांना ‘earplug’ द्या. ज्यामुळे फटाक्यांच्या आवाजाचा त्यांच्या प्रकृतीवर वाईट परिणाम होणार नाही. तसेच अस्थमा किंवा COPD चे रुग्ण असतील तर त्यांना nose mask द्या हवाप्रदुषणाचा ज्यामुळे त्यांची प्रकृती छान राहील. घरातील वयोवृद्धांना देखील हि काळजी घेण्यास सांगा.

तर मंडळी अश्या तर्हेने दिवाळीची तयारी करून आपण ह्या वर्षी आरोग्यवर्धक दिवाळी साजरी करूया.

– डॉ. अस्मिता सावे.
[ होमेओपाथ, आहारतज्ञ, आक्युप्रेशर थेरापिस्त, रेकी मास्तर.]
म्यानेजिंग डायरेक्टर,
रीजोईस वेलनेस प्रा. लि.
9821127452
pc:google
 
 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu