पार्ले महोत्सवात पहिल्यांदाच श्लोक पठण स्पर्धा.
श्लोक हा एक भारतीय संस्कृतीक ठेवा आहे. मग ते संस्कृत भाषेत असोत अथवा अन्य भाषेत. श्लोक पठणामुळे आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम रहाते. श्लोक पठाणाने वाणी , श्वासोच्छास आणि शारीरिक ठेवणं यामध्ये सुधारणा होते.
दिनांक २२ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत विलेपार्ले येथे संपन्न होणाऱ्या पार्ले महोत्सवात यंदा पहिल्यांदाच श्लोक पठण स्पर्धेचे आयोजन केले आहे.
पुढील प्रमाणे गट असतील .
१. गट – ८ वर्षांहून लहान
शुभंकरोती कल्याणम् – कोणतेही २ श्लोक (कोणतीही भाषा )
दैनंदिन सायं संस्कारांचा भाग , लहान वयापासून आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने.
गट – १२ वर्षांहून लहान
मनाचे श्लोक – पहिले ११
समर्थ रामदास यांची मनावर संस्कार करणारी २०५ श्लोकांची शब्दसंपदा.
गट – १८ वर्षांहून लहान
समर्थ रामदास यांची मनावर संस्कार करणारी २०५ श्लोकांची शब्दसंपदा.
गट – १८ वर्षांहून मोठे
भगवत गीता – १५ वा अध्याय – पुरुषोत्तम योग
ईश्वराला पूर्णपणे शरण जाण्याचे महत्व सांगणारा अध्याय
या अध्यायाचे अनेक पारंपरिक घरांमध्ये वेगवेगळ्या प्रसंगी पठण केले जाते.

