भटकंतीनामा-ध्यास भटकंतीचा!
जनसेवा समिती, विलेपार्ले आयोजित करीत आहे.. भटकंतीनामा-ध्यास भटकंतीचा!- नव्या दिशा..नव्या वाटा..नव्या संकल्पना
मंडळी, मानवाचा पिंड हा भटक्याचा पिंड आहे. कधी आपल्या पोटाची खळगी भरायला तर कधी नव्या प्रदेशाच्या शोधात, कधी एखादा भूप्रदेश पादाक्रांत करायला , कधी निसर्गाच्या ओढीने तर कधी व्यापार उदिमासाठी किंवा गेला बाजार मनोरंजन व पर्यटनासाठी म्हणून माणूस कायम भटकतच आहे. भटकंतीच्या आणि नाविन्याचा कुतूहलापोटी मग एखादा कोलंबस अमेरिकेसारख्या देश शोधून काढतो तर एखादा वास्को द गामा भारताच्या किनाऱ्यावर येऊन थडकतो किंवा एखादा अलेक्झांडर साम्राज्यविस्ताराच्या अभिलाषेने हिंदुस्तानावर आक्रमण करतो. कळीकाळापासून मानव आजतागायत अश्या विविध प्रायोजनांच्या हेतू अविश्रांत भटकत आहे. वेगवेगळ्या वाटा धुंडाळत आहे. पण या भटकंतीला नाविन्याचे, नवकल्पना आणि उदात्त हेतूंचे परिमाण लाभले तर? तर मग ती भटकंती मनाला आनंद आणि समाधान देणारी एक आनंदयात्रा ठरते. अश्याच काही आगळ्या=वेगळ्या वाटा चोखाळणाऱ्या भटक्यांच्या भ्रमंतीच्या रंजक कथा, कौतुकाच्या गाथा आणि वेदनांच्या व्यथा आपल्याला जाणून घ्यायाच्या आहेत. त्यासाठी आजच्या तरुण पिढीतील प्रसाद निक्ते आणि प्रिती पटेल ही दोन ठळक नावे आपण निवडली आहेत जे अभिमानाने आणि गौरवाने आपले कूळ भटक्यांचे आणि मूळ सह्याद्री असे सांगतात.
त्यापैकी, प्रसाद निक्ते यांनी सहयाद्रीच्या घाटमाथ्यावरील भराड ते चोरला घाट अशी तब्बल 75 दिवस एकट्याने भ्रमंती केली आहे तर प्रिती पटेल यांनी सह्यद्रितल्या देश आणि कोकण यांना जोडणाऱ्या असंख्य परिचित आणि अपरिचित घाट-वाटांची चढाई आणि उतराई करून आपलं अनुभवविश्व समृद्ध केलं आहे. त्यावर विपुल लेखनही केलं आहे. अश्या या दोन्ही जातिवंत फिरस्त्याना जनसेवा समिती, विलेपार्ले यांच्या माध्यमातून रविवार दि 17 डिसेंम्बर 2017 रोजी त्यांच्या आजवरच्या नाविन्यपूर्ण भटकंतीतले अनोखे आणि रंजक अनुभव, तसेच थरार आणि माहिती सांगण्यासाठी आपण निमंत्रित करणार आहोत.
कार्यक्रमाचा तपशील :
भटकंतीनामा-ध्यास भटकंतीचा!- नव्या दिशा..नव्या वाटा..नव्या संकल्पना रविवार दि 17 डिसेंम्बर 2017 रोजी सायंकाळी 4 ते 7
स्थान: विलेपार्ले पूर्व येथील साठ्ये महाविद्यालय. कार्यक्रम हा व्याख्यान व स्लाईडशो अश्या स्वरूपाचा असणार आहे. या दृकश्राव्य कार्यक्रमातील विषय असे आहेत.
वोकिंग ऑन द एज- वक्ते श्री प्रसाद निक्ते
घाटवाटा सहयाद्रीच्या-जीवनवाहिन्या देश-कोकणच्या- वक्त्या प्रिती पटेल
कार्यक्रम सर्वांना खुला असून विनामूल्य आहे! प्रसाद निक्ते आणि प्रिती पटेल या दोन अवलियांच्या मुलूखगिरीची गाथा ऐकायला आवर्जून आपण यावे ही नम्र विनंती. अधिक माहितीसाठी
संपर्क- पराग लिमये- 9987565738
पोस्टर क्रेडिट- Aditi Kajrekar
Advertisement


