पार्ले कट्ट्यावर अॅडव्होकेट प्रशांत माळी – एप्रिल २०१८

सामाजिक आणि सांस्कृतिक जाणिवा अधिक प्रगल्भ करणाऱ्या पार्ले कट्टा  उपक्रमात या महिन्यात आपण *सायबर कायदा आणि सायबर सुरक्षा या विषयातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ, निष्णात वकील, लेखक व उत्तम वक्ते अॅडव्होकेट प्रशांत माळी यांना भेटणार आहोत. 
आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात एकीकडे इंटरनेटच्या साहाय्याने विविध क्षेत्रात उपलब्ध असलेल्या सुखसुविधांचा लाभ घेत असतानाच दुसरीकडे मात्र त्या संदर्भातील गुन्ह्यांना आणि  सामाजिक प्रश्नांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे.   या विषयावरील विविध केसेस हाताळताना अॅड. माळी यांना आलेले अनुभव तसेच  या बाबतीत  घ्यावी लागणारी खबरदारी जाणून घेण्याची संधी पार्लेकरांना लाभली आहे. त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधतील  प्रा. छाया पिंगे.
मुक्त व्यासपीठात ‘किस्से अनोख्या प्रवासांचे’ या विषयावर बोलतील प्रसिद्ध अभिनेते व लेखक दीपक करंजीकर.
शनिवार दि. ७ एप्रिल रोजी संध्याकाळी ठीक ५.३० वाजता
स्थळ – साठे उद्यान, मालवीय पार्क रस्ता चौक, विलेपार्ले पूर्व
सर्वांना हार्दिक निमंत्रण.
Main Menu