डॉ. मिलिंद न. जोशी , उपप्राचार्य व रसायनशास्त्र विभाग प्रमुख , साठ्ये महाविद्यालय यांच्या ‘प्रवासरंग’ व ‘रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार (१९०१ ते २०१८ )’ ह्या दोन पुस्तकांचा प्रकाशनसोहळा शनिवार दिनांक १५ डिसेंबर २०१८ रोजी साठ्ये महाविद्यालयाच्या तळमजला सभागृहात आयोजित करण्यात आला होता. साठ्ये महाविद्यालय , मराठी वाङ्मय मंडळ व सहित प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. स्नेहलता देशमुख , माजी कुलगुरू मुंबई विद्यापीठ यांच्या हस्ते ‘प्रवासरंग’ चे तर श्री दिलीप पेठे , मानद सचिव , पार्ले टिळक विद्यालय अससोसिएशन यांच्या हस्ते ‘रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार (१९०१ ते २०१८ ) ह्या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
पुस्तक परिक्षण – प्रवासरंग

जमलं की प्रवास करायचा आणि सुचल की लिहायचं अस आपल्या लेखन प्रवासाच वर्णन करणाऱ्या डॉक्टर मिलिंद जोशी यांचे प्रवासरंग हे प्रवासवर्णनपर पुस्तक नुकतेच प्रकाशीत झाले आहे.
या पुस्तकात लेखकाने आपण केलेल्या विविध देशातील प्रवासाचे अगदी खुमासदार शैलीत वर्णन केले आहे.
प्रवासरंग या नावावरुन हे पुस्तक प्रवासवर्णन पर असाव असं वाटतं परंतु रूढ अर्थाने हे प्रवासवर्णन नाही.
किंबहुना लेखकाने जाणीवपूर्वक संपूर्ण प्रवासाचं वर्णन करण्यापेक्षा त्यातील ठराविक प्रसंग ,वेगळ्या पठडीतील अनुभव शब्दबद्ध केले आहेत.बऱ्याच मजेशीर तर काही हृदयद्रावक अनुभवांचे वर्णन केले आहे. पुस्तकातील विविध लेखात याची प्रचिती वाचकाला येते.
या पुस्तकातील भाषा अगदी सहज आणि अकृत्रिम आहे त्यामुळे त्यांच्या लेखनात ताजेपणा जाणवतो.
एखाद्या मित्राने प्रवास करून आल्यावर थकून न जाता अजून उत्साहाने आपल्या जवळच्या दोस्ताला प्रवासातल्या गमती जमती सांगाव्यात तसा हा प्रकार आहे.
हे पुस्तक वाचल्यावर जवळजवळ त्या प्रत्येक ठिकाणावर आपण मनातल्या मनात फिरून येतो. लेखकाबरोबर घडणाऱ्या गोष्टी जणू काही आपल्या बरोबरच घडत आहेत असे वाटून आपल्याही नकळत त्या त्या ठिकाणचा प्रवास घडू लागतो.
उपरोध ,उपहास, कोटी यांचा मुक्त वापर .साधी, सहज आणि तरीही हृदयाचा ठाव घेणारी भाषा शैली कलासक्त, मिश्कील ,निसर्गप्रेमी अशा अनेक परींनी व्यक्त झालेला निवेदक तसेच वाचकाच्या मनाचा ठाव घेण्याची हातोटी या सर्व वैशिष्ट्यांमुळे प्रवासरंग वाचकांना नक्कीच आनंद देईल.
Book available online on
https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5066762019884233323