खेलो पार्ले खेलो – लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे खेळू शकतील असा धम्माल खेलोत्सव!
(Sports Day For All Age Groups With Lots Of Vintage And Modern Games)
www.townparle.in आणि Hi ! Spirit Events यांच्या सयुंक्त विद्यमाने आम्ही सादर करत आहोत खेलो पार्ले खेलो .एक असा खेलोत्सव (स्पोर्ट्स डे फॉर ऑल एज ग्रुप्स ) जो रविवारची तुमची संध्याकाळ करेल एकदम मजेशीर आणि अविस्मरणीय !! १४ एप्रिल २०१९ ला संध्याकाळी ४ ते ९ ह्या वेळेत टिळक मंदिराच्या सावरकर पटांगणावर चमचा लिंबू , बटाटा शर्यत , रिंग गेम्स , बॉल गेम्स , ग्रुप गेम्स अश्या ह्या विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे त्यात ६ वर्षाखालील , १२ वर्षाखालील , १२ ते १८ वर्षे , १८ वर्षांच्यावर आणि ज्येष्ठ नागरिक असे विविध ग्रुप असून त्यांच्यात वेगवेगळे गेम्स खेळले जातील. विजेत्यांना मेडल्स दिली जातील शिवाय येथे वेगवेगळे फूड स्टॉल्स आणि फन स्टॉल्स तुमचे भरपूर मनोरंजन करतील. ह्या इव्हेंट साठी प्रत्येकी रु. १५०/- तिकीट आहे. ज्या तिकिटाबरोबर तुम्हाला भरपूर खेळण्याची मजा आणि वेगवेगळ्या ठिकाणांचे गिफ्ट व्हाउचर्सही मिळतील. त्यामुळे तुमचे १५०/- रु. एकदम वसूल होतील. फॉर्म्स व तिकीट खालील ठिकाणी उपलब्ध असतील.
जवाहर बुक डेपो , पार्ले बुक डेपो , I max optician , जिग्नेश बुक डेपो, Arpita Step up Dance Academy, Super Kiidz Vileparle (W) -8451802944
तसेच तुम्ही paytm ने पेमेंट करून ऑनलाईन रजिस्ट्रेशनही करू शकता. त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून फॉर्म भरता येईल.




