महिला दिन ३६५ दिवस!
महिला दिनाच्या निमित्ताने आज मी खास आपल्या महिला वर्गासाठी आजचा हा लेख लिहीणार आहे.
हा खरतर माझा फार जिव्हाळ्याचा विषय; जिव्हाळा म्हणजे इतका की मी आयुष्यात केलेल्या पहिल्या कवितेचं नाव होते “अभिमान मला स्त्री असण्याचा” … म्हणजे तुम्हाला साधारण मला ह्या विषयावर लेख लिहीताना होणार्र् या माझ्या खुषीचा अंदाज आला असेलच.
माझ्यामते रोजच महिलादिन असतोच; त्यामुळे आज मी तुम्हाला रोज करण्यासाठीच्या काही गोष्टी सांगणार आहे.
आपण स्त्रिया जन्मत: nurturers असतो. म्हणजे काय तर सर्वांनचे पालनपोषण, संगोपन करणे हे आपल्या रक्तातच असते. त्यासाठी लागणारा हळूवारपणा, सोशिकता, त्यागमुर्तीपणा आपल्या genes मध्ये निसर्गानेच दिलेला आहे. पण त्याच बरोबर गरज पडली तर कणखर होण्याची लढाऊ जिद्द आणि ताकद देखिल दिली आहे पण ती आपली need based.
जगभरात होत असणार् या research प्रमाणे “आजपर्यंतच्या स्त्रियांच्या तुलनेत आजची स्त्रिया सर्वात जास्त आजरी पडते आहे. आणि ह्याचे महत्त्वाचे कारण ताणतणाव दिसून येते.
आज पुरषांच्या तुलनेत स्त्रियांच्यी आजारी पडण्याची (ह्रुदयविकार, डिपरेशन, सांधेदुखी osteoarthritis इ.) शक्यता जवळजवळ ५०% जास्त झाली आहे.”
पण ही परिस्थिती बदलायला हवी.त्यासाठी सर्व प्रथम स्त्रियांनी स्वत:ला, स्वत:च्या आरोग्याला प्राधान्य द्यायला हवे.
पण म्हणजे नक्की काय? का? आणि कसे? असं मला खूपजणी विचारतात.
ह्यावर माझे नेहमीचं उत्तर असते, “स्त्री अख्या घराचा, कुटुंबाचा आधारस्तंभ असते. मग तो ठिसुळ, मोडकळलेला असुन कसं चालेल?”
म्हणून मग
# स्वत:ला आनंद देणारा एखादा छंद जोपासा, तुमच्या स्वत:च्या मित्रमैत्रिणींना भेटण्यासाठी ठरवून वेळ काढा. आणि हे करण्यामागे शास्त्रिय कारण आहे. ह्यामुळे तुमच्या शरिरात “आॅक्सिटोसीन” नावाचे हाॅरमोन तयार होते.
“आॅक्सिटोसीन” हे आपल्या शरिरात तयार होणार् या ४ “हॅप्पी हाॅरमोन” पैकी एक आहे. हॅप्पी / आनंदी राहण्यासाठी हे गरजेचे असते.
# आपल्या हाॅरमोन पातळ्यांवर लक्ष ठेवा. इस्ट्रोजेन, प्रोजेस्ट्राॅन, इन्सुलिन योग्य प्रमाणात आहेत ह्याकडे लक्ष द्या. ह्या हाॅरमोन मुळे फक्त शारिरीकच नाही तर मानसिक आरोग्याला देखिल मदत होते. हाॅरमोनच्या पतळीत बिघाड झाल्यास लठ्ठपणा, सांधेदुखी, मानसिक तणाव, मासिक पाळीच्या तक्रारी, त्वचेच्या तक्रारी, झोपेच्या तक्रारी असे अनेक त्रास सुरू होतात.
# रोज न चुकता १ तास व्यायाम करा. सकाळी, दुपारी, रात्री जेव्हा शक्य असेल तेव्हा. बाहेर जाणे शक्य नसेल तर घरात एका खोलीतून दुसर्या खोलीत चालण्याचा व्यायाम करा. हे तुम्ही मुलांना अभ्यासाला बसवून त्यांच्याकडे लक्ष देतादेता किंवा गॅसवर चढवलेल्या जेवणावर लक्ष देतादेता सुद्धा करु शकता. ह्यामुळे एन्डाॅर्फिन, डोपामाइन आणि आॅक्सिटोसीन ही ३ही “हॅप्पी हाॅरमोन” निर्माण होतात.
# सर्वांची काळजी घेऊन, करियर साठीची धावपळ करून, घरचं दारचं सगळं सांभाळून मग “ती” ला जेवढी काय झोप मिळते ती बर्याचदा पुरेशी नसते. रोज किमान ७-८ तास झोप गरजेची आहे. आपले शरीर ह्या विश्रांतीच्या काळात दिवसभर झालेला सगळा damage भरून काढते. हा damage शारिरीक , मानसिक दोन्हीमुळे जमा झालेला असतो. हया repair process मुळेच उद्याची नवी आव्हानं पेलायला आणि अडथळ्यांना तोंड द्यायला तुम्ही तय्यार होऊ शकता.
हल्लीच झालेल्या एका संशोधनाप्रमाणे (Research paper) “स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त झोपेची गरज असते.” त्यामुळे स्वत:ची डागडुजी करायला पुरेसा वेळ द्या.
# ह्याचप्रमाणे आपण शरिरात काय जाऊ देतो हेदेखिल आपल्यावर फक्त शारिरीक द्रुष्ट्याच नाही तर मानसिक द्रुष्ट्या देखिल परिणाम करते हे विसरू नका. भरपूर ताजी फळे, भाज्या ह्यांचा रोजच्या आहारात समावेश करा. W.H.O. (World Health Organisation) च्या म्हणण्याप्रमाणे रोज दिवसभरात ५ वेळा साधारण ८० ग्राम फळे , भाज्या पोटात जाणे गरजेचे आहे. ह्याचबरोबर रोजचा नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण हा चौरस आहार असणे तितकेच महत्त्वाचे आहे.
पण ह्याचबरोबर तुम्हाला हवे तेवढेच आणि गरजे इतकेच खा. उरले आहे म्हणून किंवा मुलांनी नको म्हंटले म्हणून उरलेले जेवण संपवण्यासाठी पोट भरलेले असतानासुद्धा खाउ नका.
त्याऐवजी दुसर् या दिवशीच्या नाशत्याला फोडणीची पोळी , फोडणीचा भात, भाताचे कटलेट, वेजिटेबल ओट्स, हमस पिनव्हील असे अनेक नाविन्यपूर्ण पदार्थ करा.
स्त्रियांना काही जिवनसत्वं ( ब९, ब१२, ड) आणि खनिजं (लोह, कॅल्शियम) योग्य प्रमाणात मिळणे फार गरजेचे असते.
भारतीय स्त्रियांमध्ये अॅनिमीया (शरिरात रक्ताची कमी) खूप पाहायला मिळतो.
अॅनिमीयाशी लढा देण्यासाठी रोज सकाळी उपाशीपोटी २४ तास भिजवलेले ४ काळे वाटाणे खा.
जिवनसत्व आणि खनिजं पुरेश्याप्रमाणात मिळण्यासाठी आहारामध्ये भरपूर फळे, पालेभाज्या, सुकामेवा (dry fruits & nuts),कडधान्य, पालेभाज्या ह्यांचा सामावेश करा.
आहारात विवीध धान्यांचा जसे नाचणी, ज्वारी, बाजरी, ओट्स ह्यांचा समावेश करा.
लक्षात असू द्या “रिकाम्या घड्यातून दुसर् या ना काही देता येत नाही. त्यामुळे आधी स्वत:ची काळजी घ्या. तुम्ही आनंदी, सशक्त असाल तर इतरांना आनंदी ठेऊ शकता.”
तर ह्या सोप्या गोष्टींचा समावेश रोजच्या जीवनात करा आणि आजपासून पुढे ३६५ दिवस रोज महिलादिन साजरा करा.
तुम्हा सर्वजणींना “महिलादिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”
– By Dr. Asmita Sawe.
- Asmita Sawe.
- Homeopath, Nutritionist, Acupressure therapist & Reiki Master.
- Managing Director, Rejoice Wellness Pvt Ltd.
- Contact:
- Call : 9821127452 / 022 26112200
- Email : [email protected]
- Website: rejoicewellness.in


