पार्ले टिळक विद्यालयाच्या शतसंवत्सरी वर्षा निमित्त PTVA चे डिजिटल प्लॅटफॉर्म्स 

पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन आणि पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यम  या शाळेने ९ जून २०२०रोजी शतसंवत्सरी वर्षात प्रवेश केला.
खरे तर या वर्षी खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे कार्यक्रम करणे योजले होते परंतु सध्याची परिस्थिती लक्षात घेता सध्याच्या परिस्थितीत नवीन माध्यमांचा उपयोग करून डिजिटल स्वरूपात सर्व आजी माजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा मानस ठेवून वेगवेगळे उपक्रम  राबवले जात आहेत .
त्यातले दोन महत्त्वाचे  उपक्रम म्हणजे :
PTVA App  आणि www.parletilakvidyalayaassociation.com ही वेबसाईट 
या दोन्ही द्वारे पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन अंतर्गत येणाऱ्या विविध शाळा आणि कॉलेज यामधील विविध उपक्रमांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल.
तसेच या शतसंवत्सरी वर्षा निमित्त सुरू केलेले ‘आठवणींचे विश्व’ हे वेबसाईट वरील सदर ! हे सदर तुम्हाला मागच्या शंभर वर्षांच्या इतिहासाचा मजेशीर परिचय करून देईल.
जून महिन्यातील या सदरात सादर झालेल्या दोन लेखांची लिंक येथे आपणासाठी देत आहोत.या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते लेख वाचू शकता.
 
PTVA App  डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून ते ऍप डाउनलोड करू शकता.
Download the Parle Tilak Centenary App from Google Play Store & stay updated about the Centenary Year celebrations and the latest news, information, events and updates from your respective school.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu