पार्ल्याचे जावई श्री.भूषण शेंडये यांचा ‘ शेंड्ये गुरुजींच्या परदेशी पूजा’ हा अनोखा उपक्रम
पार्ल्यात बरेच जण आहेत ज्यांची मुले परदेशात स्थायिक झालेली आहेत. परदेशात शिक्षणासाठी गेलेले बरेच पार्लेकर उत्तम नोकरी मिळाली की त्या देशालाच आपली कर्मभूमी मानतात आणि तिथेच स्थायिक होतात. असे बरेच पार्लेकर आज परदेशात आपले वास्तव्य करत आहेत. परदेशात राहत असले तरी आपली संस्कृती , परंपरा ते विसरलेले नाहीत. आजही नवीन घर घेतले की गणेश पूजन, वास्तू शांती , काही छान घडले की सत्यनारायणाची पूजा अशा अनेक गोष्टी आज तिथेही ते सर्व जण करतात. पण बऱ्याचदा तिथे गुरुजी मिळण्यास थोडे कठीण जाते. म्हणूनच पार्लेकर जावई असलेले श्री भूषण शेंड्ये यांनी नवीन उपक्रम सुरु केला आहे. तुम्ही कुठेही राहत असाल ते झूम किंवा तत्सम प्लॅटफॉर्म वरून उत्तम रित्या पूजा सांगतात, या प्रकाराने पूजा करताना जणू गुरुजी आपल्या बरोबरच आहेत आणि पूजा सांगत आहेत असे वाटते. गुरुजींची , आणि यजमानांची श्रद्धा आणि उत्तम रित्या केली जाणारी पूजा यामुळे मनाला छान समाधान मिळते. जशा ऑफिसच्या मिटींग्स आता झूम वर सर्रास होऊ लागल्या आहेत तसेच पूजाही आता झूम वर करणे सोपे झाले आहे. आपली श्रद्धा असली की देवापर्यंत आपली पूजा नक्की पोहोचते. योग्य रीतीने पूजा सांगणे महत्वाचे आणि हे सारे श्री. शेंड्ये गुरुजी यांनी व्यवस्थित जाणले आणि परदेशातही राहणाऱ्या आपल्या लोकांना पूजेचे समाधान मिळावे , आंतरिक आनंद मिळावा यासाठी त्यांनी ‘शेंड्ये गुरुजींच्या परदेशी पूजा’ या उपक्रमाची सुरुवात केली.
त्यांच्याशी संपर्क साधून आपण आपल्या मुलांच्या / नातेवाईकांच्या घरी जे भारताबाहेर राहत आहेत त्यांच्यासाठी पूजा बुक करू शकता.
अधिक माहितीसाठी संपर्क :
श्री. भूषण शेंड्ये
९२२३९०६१६३
9223906163

