मी होणार करोडपती ©निलेश तावडे
टेलिव्हिजन वर नुकतीच करोडपती मालिका झाली आणि अनेकांनी मालिकेत सहभागी होण्यासाठी आपले नशीब आजमवायला सुरवात केली. मालिकेतून काही मोजके लोक करोडपती होतील मात्र इतरांसाठी मालिका फक्त करमणुकीचा भाग राहील.
आपण करोडपती व्हावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते . मात्र झटपट श्रीमंत होण्याचा नादात आपण फसवणुकीला बळी पडतो व पोंजी योजनांमध्ये आपले मुद्दलही गमावून बसतो. आपल्या संपत्ती निर्माणासाठी आपल्याला शिस्त आणि संयम ह्या दोन महत्वाच्या बाबी अंगिकाराव्या लागतात. त्यासाठी आपल्याला म्युच्युअल फंड मदत करतात. म्युच्युअल फंड हे सेबी द्वारा नियंत्रित असतात त्यामुळे आपले पैसे कोणी पळवून घेऊन जाईल हि भीती अजिबात नसते. मात्र म्युच्युअल फंडातील गुंतवणूक हि बाजारातील जोखिमेचा अधीन असते. शेयर बाजार हा कायम चंचल व अस्थिर असतो. त्यामुळे आपण जर शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक केली तर नक्कीच आपण ह्या अस्थिर बाजारावर मात करू शकतो व दीर्घकाळामध्ये चांगली संप्पती निर्माण करू शकतो. ह्या साठी म्युच्युअल फंड आपल्याला एस आई पी ची सुविधा देतात. ह्या सुविधे द्वारे एक ठराविक रक्कम दरमहा आपण म्युच्युअल फंडाकडे परस्पर आपल्या बँकेच्या खात्यातून वळती करू शकतो. एस आई पी चा मागील इतिहास पहिला तर इक्विटी म्युच्युअल फंडांनी एस आई पी तुन खूप चांगला म्हणजे अगदी १५ ते १८ % किंवा कधी त्याहून जास्त परतावा दिला आहे. आपले करोडपती होण्याचे स्वप्न म्युच्युअल फंडाच्या एस आई पी तुन कसे साकारत येईल ते आपण पाहू. ह्या साठी आपण म्युच्युअल फंडाचा कंजर्वेटिव्ह १२% परतावा गृहीत धरू. बरेच आर्थिक सल्लागार आपल्या संकेत स्थळावर आपली गुंतवणूकदाराच्या माहितीकरिता एस आई पी चे कॅल्क्युलेटर उपलब्ध करतात ज्यातून आपण आपल्या गुंतवणुकीतील पुढील काळातील वाढीचा अंदाज बांधू शकतो. असाच कॅल्क्युलेटर आमच्या www.nileshtawde.com ह्या संकेत स्थळावर सुद्धा आहे.
आपण जर रु ३000 ची एस आई पी चालू केली तर आपले १ करोडचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला ती ३० वर्षे चालू ठेवावी लागेल.
आपण जर रु ५००० ची एस आई पी चालू केली तर आपले १ करोडचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला ती २६-२७ वर्षे चालू ठेवावी लागेल.
आपण जर रु १०००० ची एस आई पी चालू केली तर आपले १ करोडचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला ती २० वर्षे चालू ठेवावी लागेल.
आपण जर रु १५००० ची एस आई पी चालू केली तर आपले १ करोडचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला ती १६-१७ वर्षे चालू ठेवावी लागेल.
येणाऱ्या काळात म्युच्युअल फंडांनी १२% पेक्षा जास्त परतावा दिला तर आपले करोडपती होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता कमी कालावधी लागेल.
आता आपण अजून चांगला सॅन्टिफिक अँप्रोच पाहू , दर वर्षी आपले उत्पन्न हे वाढत असते, अशावेळी आपण आपली एस आई पी ची रक्कम वाढविली तर . म्युच्युअल फंड आपल्याला स्टेप अप एस आई पी ची सुविधा देतात. म्हणजेच दरवर्षी आपण ठराविक रकमेने आपली एस आई पी ची रक्कम वाढवू शकतो. त्या साठी फक्त एकदाच आपल्याला सूचना द्यायच्या असतात.
आपली रु ३००० ची एस आई पी जर आपण दरवर्षी रु ५०० ने वाढविली तर २४ वर्षात आपले रु १ करोड चे स्वप्न पूर्ण करू शकतो म्हणजेच स्टेप अप एस आई पी ने आपले उद्दिष्ट ६ वर्षे अगोदर पूर्ण होईल.
आपली रु ३००० ची एस आई पी जर आपण दरवर्षी रु १००० ने वाढविली तर २१ वर्षात आपले रु १ करोड चे स्वप्न पूर्ण करू शकतो म्हणजेच स्टेप अप एस आई पी ने आपले उद्दिष्ट ९ वर्षे अगोदर पूर्ण होईल.
आपली रु १०००० ची एस आई पी जर आपण दरवर्षी रु २००० ने वाढविली तर १५ वर्षात आपले रु १ करोड चे स्वप्न पूर्ण करू शकतो म्हणजेच स्टेप अप एस आई पी ने आपले उद्दिष्ट ५ वर्षे अगोदर पूर्ण होईल.
आता हाच कॅल्क्युलेटर आपण दुसऱ्या पद्धतीने पाहू, जर माझे वय ४० आहे व मी आता रु २०००० ची एस आई पी करून दर वर्षी रु २००० वाढविली तर माझ्या निवृत्तीच्यावेळी किती संपत्ती जमा होऊ शकते. साधारण रु ३ करोड १७ लाख जमा होतील.
आपल्या एस आई पी चालू करण्याच्या क्षमतेनुसार आपण एस आई पी ची रक्कम तसेच स्टेप अप एस आई पी ची रक्कम ठरवू शकतो व आपल्या स्वतःसाठी निश्चित असे संपत्ती निर्माणाचे उद्दिष्ट ठरवू शकतो. एस आई पी करताना लार्ज कॅप फंड / मिडकॅप फंड / स्मॉल कॅप फंड कि ह्या कॅटेगरीचे कॉम्बिनेशन करावे ह्या साठी योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक सल्लागारांना भेटा. आजकाल देशाच्या कानाकोपऱ्यातून घरी बसल्या ऑनलाईन आपल्या मोबाईल फोन वरून अगदी १५-२० मिनिटात एस आई पी चालू करू शकतो व नंतर मोबाइलला अँप द्वारे आपल्या गुंतवणुकीतील वाढ नियमित पणे पाहू शकतो. लक्षात असुद्या कि आपण हे जे कॅल्क्युलेटर पहिले ते आपल्याला आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी अंदाज देतात. बाजारातील उतार चढावामुळे आपल्या गुंतवणुकीवर परिणाम होऊ शकतो. आपल्या करोडपती होणाच्या स्वप्नपूर्तीसाठी आमच्या शुभेच्छा .
धन्यवाद.
निलेश तावडे ९३२४५४३८३२
nilesh0630@gmail.com
लेखक हे २० वर्ष म्युच्युअल फंड क्षेत्रात कार्यरत होते सध्या ते गुंतवणूक सल्लागार आहेत.
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक हि बाजारातील जोखिमेचा अधीन असते, कृपया योजनेसंबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.

