अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग!- पार्लेकरांची दिंडी.

अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग!- ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा. पार्लेकरांची दिंडी 

मंडळी,

आषाढी एकादशीच्या संध्याकाळी विठुरायाच्या नामगजरात आणि ज्ञानबा-तुकारामाच्या जयघोषात रंगून जायला येताय ना?

30 वर्षांची अखंड परंपरा जपणारा ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आपण याही वर्षी आयोजित केला आहे.

शुक्रवार, दि 12 जुलै 2019 रोजी ठीक 6 वा वारकऱ्यांच्या पथकासमवेत आपली नामगजराची दिंडी निघणार आहे.

या दिंडीचा मार्ग असा असेल…

हनुमान मंदिर (कंकू वाडी, फिरोजशहा मेहता रोड, विलेपारले पूर्व)- नेहरू रोड- जवाहर बुक डेपो- महात्मा गांधी मार्ग- पार्लेश्वर मंदिर- पार्ले टिळक विद्यालय- वर्मा टेलर- तेजपाल स्कीम मार्ग क्रमांक 3- विठ्ठल मंदिर

शुक्रवार, दि 12 जुलै रोजी ठीक 6.30 वा पालखी मार्गस्थ होईल आणि वरील मार्गाने टाळ-मृदुंगाच्या ठेक्यावर आणि विठ्ठल नामाच्या तालावर पदन्यास करत करत रात्रौ 8.30 पर्यंत समाप्त होईल.

मोठया संख्यने पंढरीच्या वारीची अनुभूती घ्यायला नक्की या ही नम्र विनंती
🙏🙏🙏🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu