“बालसंस्कार वर्ग ” व “व्यक्तिमत्व विकास वर्ग “
प्रत्येक घरात आपल्या मुलांवर योग्य ते संस्कार केले जातातच परंतु सामाजिक भान, समाजात मिळून मिसळून रहाण्याची गरज व त्यासाठी जरुरी असलेली संघभावना ह्याची जाणीव, आपल्या ऐतिहासिक आदर्श व्यक्तींचे कार्य व त्यांची माहिती ह्या साठी जनकल्याण समिती तर्फे
८ ते १५ ह्या वयोगटातील मुलामुलींसाठी आयोजीत करण्यात येत आहे .”बालसंस्कार वर्ग ” व “व्यक्तिमत्व विकास वर्ग ” .
हा वर्ग आठवड्यातुन एक दिवस – दर शुक्रवारी संध्याकाळी ६.३० ते ७.३० ह्या वेळेत उत्कर्ष मंडळ विलेपार्ले पुर्व येथे घेण्यात येईल.
वर्गाचे साधारण स्वरूप खालील प्रमाणे असेल.
प्रारंभ प्रार्थना – साधे व्यायामप्रकार – योगासने – सांघीक खेळ – आरोग्य, सामाजिक भान, इतिहास किंवा एखाद्या चालु विषयावर चर्चा / कथाकथन / समुहगान – समाप्ती प्रार्थना.
शुक्रवार दिनांक २ ऑगस्ट रोजी प्रथम वर्ग होणार आहे.
मर्यादित जागा उपलब्ध त्यामुळे प्रवेश घेण्यासाठी नावनोंदणी अनिवार्य आहे.
सदर वर्गाच्या नावनोंदणी साठी व अधिक माहितीसाठी संपर्क
विद्याधर फडके – 9819014552
गिरीजा धामापूरकर – 9819277784
उपेंद्र प्रभु – 9969039653
मनोज भिसे – 9820241853,

