समीर धोंड लिखित ‘चिंध्या अनुबंधांच्या’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा
मंगळवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी साठ्ये महाविद्यालयाच्या सभागृहात सायंकाळी ६:३० वाजता लेखक समीर विजया रमेश धोंड यांच्या ‘चिंध्या अनुबंधांच्या’ या पहिल्या मराठी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. हे पुस्तक म्हणजे लेखकाला पडलेल्या काही प्रश्नांचा, मनात आलेल्या काही विचारांचा, निसर्गाकडून शिकलेल्या लहानमोठ्या धड्यांचा, पक्ष्याप्राण्यांकडून मिळालेल्या कडूगोड शिकवणीचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेखकाच्या भोवताली घडलेल्या निवडक गोष्टींच्या निरीक्षणांचा संग्रह आहे.या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून मराठी, हिंदी नाटक, मालिकेतील कलाकार श्री संदीप कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. तसेच ‘चिंध्या अनुबंधांच्या’ हे पुस्तक कार्यक्रमस्थळी विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.
‘चिंध्या अनुबंधांच्या’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला नक्की भेट द्या. अधिक माहिती साठी खालील नंबर वर संपर्क करा. 081042 86202


