दुसऱ्या जागतिक मल्लखांब स्पर्धेत श्री. पार्लेश्वर व्यायाम शाळेचे मल्लखांब खेळाडू, श्री अक्षय तरळ आणि कु. जान्हवी जाधव यांचे दैदिप्यमान यश!
विश्व मल्लखांब संघटनेतर्फे नुकत्याच आयोजित केलेल्या, दुस-या विश्व कप मल्लखांब स्पर्धेत, श्री. पार्लेश्वर व्यायाम शाळेचे मल्लखांब खेळाडू, श्री अक्षय तरळ आणि कु. जान्हवी जाधव या दोघांनी, दैदिप्यमान यश संपादित करून विश्वविजेता ट्रॉफी जिंकली आहे. या यशात त्या दोघांचे मार्गदर्शक श्री गणेश देवरुखकर यांचा ही मोठा वाटा आहे. सर्व पार्लेकरांतर्फे या संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन !
विश्व मल्लखांब संघटनेतर्फे नुकत्याच दिनांक ९ ते ११ मे २०२३ रोजी आसाम येथे दुसऱ्या विश्व मल्लखांब अजिंक्यपद स्पर्धा पार पडल्या. सुमारे दहा देशातील 120 खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.
या स्पर्धेमध्ये संघनायक चंद्रशेखर चौहान, अक्षय तरळ, एम.हेमचंद्र, शुभंकर खवळे, संतोष शोरी आणि पंकज गार्गमा यांच्या पुरुष भारतीय संघाला 262.199 गुणांसह प्रथम क्रमांक, . दुसऱ्या क्रमांकावर 99.333 गुणांसह USA अमेरिकेचा संघ आला तर तृतीय क्रमांक नेपाळ संघाला मिळाला.

रुपाली गंगावणे, जान्हवी जाधव, जेसिका प्रजापती, अंजली यादव, संतय पोटय आणि जयंती कचलाम यांच्या महिला भारतीय संघाला अपेक्षेप्रमाणे पूरलेला आणि दोरी मल्लखांब या दोन्ही प्रकारांमध्ये 214.183 गुणांसह सांघिक सुवर्णपदक मिळाले. दुसऱ्या क्रमांकावर 147.333 गुणांसह USA अमेरिकेचा संघ आला तर तृतीय क्रमांक नेपाळ संघाला मिळाला.

वैयक्तिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील मुंबई उपनगर मधील श्री पार्लेश्वर व्यायाम शाळा विलेपार्ले येथील खेळाडू अक्षय तरळ याने 107.242 गुणांसह वैयक्तिक अजिंक्यपद पटकावले. द्वितीय क्रमांकावर भारताचाच शुभंकर खवळे 82.341 या गुणांसह आला तर तिसरा क्रमांक अमेरिकेच्या अमेरिकेच्या अद्वैत कुलकर्णी याला मिळाला.

महिलांमध्ये देखील महाराष्ट्रातील मुंबई उपनगर मधील श्री पार्लेश्वर व्यायाम शाळा विलेपार्ले येथील खेळाडू कुमारी जान्हवी जाधव हिला 88.067 गुणांसह वैयक्तिक अजिंक्यपदाचे सुवर्णपदक मिळाले. दुसरा क्रमांक 68.291 गुणांसह मुंबईच्याच रुपाली गंगावणे हिचा आला तर अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणारी कु. ऋचा रुपेश कुलकर्णी हिला 54.117 गुणांसह कांस्यपदक मिळाले.

मल्लखांब या अस्सल भारतीय पारंपरिक खेळाची ही दुसरी जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आहे. एकाच देशातील, एकाच संस्थेतील खेळाडूंना मिळाले आहे. आणि याचे प्रमुख श्रेय हे श्री पार्लेश्र्वर व्यायामशाळेचे प्रमुख प्रशिक्षक श्री गणेश देवरुखकर व सौ ईशा देवरुखकर आणि मार्गदर्शक महेश आटळे यांचे आहे.
या स्पर्धेमध्ये दोनही साधनांवर छोटा संच, मोठा संच, पुरलेला मल्लखांब दोरी मल्लखांब साधन विजेतेपद, सांघिक विजेतेपद आणि वैयक्तिक विजेतेपद अशी सहा पदके मिळतात
.
अक्षय तरळला सांघिक सुवर्णपदक, वैयक्तिक सुवर्णपदक, पुरलेल्या मल्लखांबतला छोटा संच व मोठा संच या दोघातही सुवर्णपदक, दोरी मल्लखांबातील मोठ्या संचातील सुवर्णपदक आणि छोट्या संचातील सिल्वर मेडल रौप्यपदक अशी पाच सुवर्ण आणि एक रौप्य अशी 6 पदके मिळाली आहेत तर जान्हवी जाधवला सांघिक सुवर्णपदक, वैयक्तिक सुवर्णपदकासह दोन्ही मल्लखांबातली दोनही सुवर्णपदके आणि पुरलेल्या मल्लखांबातील मोठ्या संचातील सुवर्णपदक व छोट्या संचातील रौप्य पदक अशी सहा पदके मिळाली आहेत त्यामुळे या दोन्ही खेळाडूंना मिळून पार्लेश्वर व्यायामशाळेकडे दहा सुवर्ण आणि दोन रौप्य अशी बारा पदके आलेली आहेत.

या स्पर्धेत भारतासह अमेरिका नेपाळ जपान व्हिएतनाम साऊथ आफ्रिका ब्राझील फ्रान्स बहरीन इत्यादी देश ही सहभागी झाले होते.

