श्री निमिष पाटगांवकर यांच्या”F1- स्टोरी”* या विश्वकर्मा प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होत असलेल्या पुस्तकाचे दि 17फेब्रुवारी 2018 रोजी प्रकाशन

श्री निमिष पाटगांवकर  यांच्या  “F1- स्टोरी”या विश्वकर्मा प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होत असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन शनिवार दि 17फेब्रुवारी 2018 रोजी ज्येष्ठ क्रिडा समिक्षक श्री. द्वारकानाथ संझगिरी आणि श्री. मकरंद वायंगणकर यांच्या हस्ते होत आहे. या प्रकाशन सोहळ्याचे आपल्याला अगत्याचे निमंत्रण देत आहे.

दिनांक   शनिवार 17 फेब्रुवारी 2018
वेळ;  संध्याकाळी 6 ते 8
स्थळ: देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ सभागृह हनुमान रोड
विलेपार्ले (पूर्व) मुंबई 400057

थोडेसे पुस्तकासंबंधी :- ” F1- स्टोरी” हि कथा आहे अमेरिकेतील विद्यार्थी आयुष्याची. कधीही घराबाहेर न राहिलेल्या भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबातून अमेरिकेला शिकायला गेलेल्या प्रत्येकाची हि गोष्ट आहे. F1 म्हणजे विद्यार्थी व्हिसा. अमेरिकेत विद्यार्थी म्हणून शिकायला आत्तापर्यंत अनेक पिढ्या गेल्या. काळानुसार बदल पिढ्यांनी अनुभवले पण या सर्व काळात अमेरिकेतील विद्यार्थी आयुष्यातली मूळ तत्त्वे तीच राहिली. विद्यार्थी आयुष्यातले अनेक चढ उतार आणि गमती जमती या पुस्तकात मांडल्या आहेत. ज्यांनी हे आयुष्य स्वतः अनुभवले त्यांच्या आठवणी हे वाचून नक्कीच जाग्या होतील आणि बाकी सर्वांना खरेखुरे विद्यार्थी आयुष्य कळेल…

Main Menu