मराठी गझल गायन स्पर्धा
मराठी गझल गायनाची स्पर्धा प्रथमच रविवार दिनांक १० डिसेंबर , २०२३ रोजी विलेपार्ले , मुंबई येथील डहाणूकर महाविद्यालयाच्या केशवराव घैसास सभागृहात आयोजित केली आहे .
गझल सागर प्रतिष्ठान आणि एम. एल. डी. सी. अल्यूम्नी असोसिएशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही स्पर्धा तीन गटात विभागलेली आहे.
पहिला गट : आंतर-महाविद्यालयीन विद्यार्थी
दुसरा गट : एम.एल.डी.सी. चे माजी विद्यार्थी
तिसरा गट : खुला गट
स्पर्धेच्या प्रत्येक गटात ₹ ५००० , ₹ ३००० , ₹ २००० अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.
मराठी गझल बद्दल महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होणे तसेच मराठी गझल साठी पोषक वातावरण होण्यासाठी या उपक्रमाचा निश्चितच उपयोग होऊ शकेल.
संपर्क :
भीमराव पांचाळे : ८८७९४३०९९७
मिलिंद बागुल : ८०९७०००६२५

