जीएसटी (GST ) लागू झाल्यानंतर काय झाले स्वस्त काय झाले महाग ???
१ जुलै पासून GST साधारण ५ स्लॅब्स मध्ये लागू झाला आहे. ५%,१२%,१८%,२८% आणि Nil . हाच GST आपल्या दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या प्रकाराने परिणाम करणार आहे. वाहतूक, मनोरंजन , रोजचे खाणे पिणे, फिरणे सगळ्या गोष्टींवर GST चा होणारा परिणाम या लेखात नमूद केला आहे.
विमान वाहतुकीबाबद बघितले तर इकॉनॉमी क्लासची तिकिटे स्वस्त होतील कारण आधीच्या ६% च्या तुलनेत आता फक्त ५% टॅक्स लागू होईल. पण बिझनेस क्लासच्या तिकिटांवर ९% च्या ऐवजी १२% टॅक्स लागल्याने तिकिटे महाग होतील.
बाहेर खाणे , हॉटेल मध्ये जेवणेही GST मुळे महाग केले आहे. दोन्ही AC आणि NON AC येत रेस्टोरेंट्सचे टॅक्स रेट वाढल्याने AC रेस्टोरेंट मध्ये जेवायला गेलात तर १०. ६ % च्या ऐवजी १८% भरावा लागेल. तसेच नॉन AC च्या बाबतीतही टॅक्स ६% वरून १२% केल्याने बिल अधिकच महाग होईल. अगदी ५०लाखांपर्यंत वार्षिक उलाढाल असलेल्या उपाहारगृहालादेखील सरकारला ५% GST भरावा लागेल.
हॉटेल रूमच्या बाबतीतही टॅक्स मध्ये बदल झाले आहेत. हे रेट १८ % ते २५ % च्या दरम्यान असतील . ज्या हॉटेलच्या रूमचे भाडे पर नाईट १०००-२५०० आहे त्यांना १२% , २५०० ते ५००० दरम्यान असेल तर १८% आणि ५००० च्या वर असल्यास २८ % GST लागेल. जे लॉजेस १००० किंवा त्या पेक्षा कमी भाडे घेत असतील त्यांनाही ५% GST भरावा लागेल.
पिच्चरच्या तिकिटांसाठी सध्या ३५ ते ५५ % पर्यंत एंटरटेनमेंट टॅक्स आकारला जातो. आता GST आल्यावर रु. १०० च्या वरील तिकिटांवर २८% GST लागेल. पण त्याने तिकिटे स्वस्त होतीलच असे नाही. कारण प्रत्येक राज्याला GST व्यतिरिक्त लोकल चार्जेस लावण्याची मुभा असेल.
आपल्या रोजच्या वापरातील वस्तू जसे वॉशिंग मशीन , टी. व्ही., फ्रीज , वॉटर हिटर , गिझर , व्हॅक्युम क्लीनर या साऱ्यांवर २८% GST लागेल. तर मोबाईल फोन व स्मार्ट फोन वरील एकूण टॅक्स बर्डन कमी होईल. मोबाइल, टॅबलेट, स्पीकर , माइक्रोफोन यावर GST १८ % लागेल जो आधी २६ ते २८ % च्या दरम्यान टॅक्स होता. कदाचित हे सरकारच्या डिजिटलायझेशन च्या मोहिमेचा परिणाम असेल.
पंखे २४% वरून १८ % वर येतील असे वाटले होते पण त्यांच्यावर २८ % टॅक्स लागेल. LED लाईट्स वर आत्ताच्या १५ % ऐवजी १२ % GST लागेल. तर वॉटर एअर कूलर वर आत्ताच्या २४ ते २६ % च्या ऐवजी २८ % GST लागेल.
प्रेशर कुकर आणि नॉन स्टिक पण वर १२% GST लागेल जो पूर्वी अनुक्रमे १५-१८% आणि १२-१६% होता. AC वर ही २८ % GST लागेल.
AC ,टी. व्ही. अशा नित्याच्या वस्तू असल्या तरीही त्यावर टॅक्स कमी होण्या ऐवजी १८ % च्या जागी २८ % लावल्यामुळे या वस्तू महाग होतील. हेच नव्हे तर १२-१४% टॅक्स आणि ८. ६ % एक्ससाईज ड्युटी लागणारी छोटी उपकरणे जसे ज्युसर , इस्त्री इ. ही २८ % च्या स्लॅब वर आल्याने हे जगातले हायेस्ट GST प्रॉडक्ट झाले आहेत. त्यामुळे कमी जास्त भाव करत प्रत्येक वस्तू घेऊ का नको असा विचार करताना या सगळ्याचा परिणाम आपल्या रोजच्या जीवनावर भरपूर होणार आहे एव्हढे नक्की!!
PC:Unknown

