श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा भक्तिपूर्ण वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संपन्न

श्री जय हनुमान व्यायाम शाळा, रामवाडी या संस्थेमार्फत प्रतिवर्षी साजरा होणारा श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यंदा संस्थेचे ६८ वे वर्ष होते. दिनांक ६ आणि ७ एप्रिल असा दोन दिवसीय उत्सव साजरा करण्यात आला. उत्सवाच्या पहिल्या दिवशी श्री हनुमान जन्मोत्सव व श्री सत्यनारायण महापूजा तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तसेच दुसऱ्या दिवशी भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या दोन दिवसीय सोहळ्याला हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शविली असून तब्बल ५००० भाविकांनी हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या महाप्रसादाचा लाभ घेतला. भव्य श्री राम सेतू देखावा हे सोहळ्याचे विशेष आकर्षण होते.

 गेल्या ६८ वर्षांपासून विलेपार्ले तसेच मुंबई उपनगरात नावाजलेल्या संस्थांमध्ये श्री जय हनुमान व्यायाम शाळा, रामवाडीचे नाव गणले जाते. संस्थे मार्फत प्रतिवर्षी अनेक सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात. रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर , गरजू होतकरू मुलांना अल्पदरात वह्या वाटप या सारखे उपक्रम तसेच श्री गणेश उत्सवात विलेपार्ले पूर्व येथील हेडगेवार मैदानात संपन्न होणारे श्री गणेश मूर्तीच्या विसर्जनाची सेवा देखील संस्थेचे कार्यकर्ते गेली 14 वर्ष विनामूल्य करत आहेत. कोराना काळात देखील संस्थेमार्फत मोफत अन्नदान केले जात होते.

  “श्री जय हनुमान व्यायाम शाळा, रामवाडी या आमच्या संस्थे मार्फत प्रतिवर्षी साजरा केला जाणारा श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा यंदाही भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही संपूर्ण पार्लेकरांनी या सोहळ्याचा आनंद लुटला. दरवर्षी आपल्या संस्थेमार्फत श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्या व्यतिरिक्त देखील वर्षभर अनेक सामाजिक, शैक्षणीक,क्रीडा क्षेत्रातील उपक्रमांचं आयोजन केलं जातं. या उपक्रमांमध्ये देखील पार्लेकर नागरिकांनी नक्की सहभाग घ्यावा.” असे आवाहन संस्थेचे सचिव श्री. सिद्धेश चंद्रकांत पवार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu