गुंतवणूक करताय ना …करत रहा…
गेले अनेक महिने सातत्याने वर चढणारे शेअर मार्केट सगळ्यांच्या कुतूहलाचा विषय झाले आणि त्यामुळे पर्यायाने म्युचुअल फंडाकडे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले. आत्तापर्यंत म्युचुअल फंड या गुंतवणूक प्रकाराकडे कधीच न वळलेले लोक सुद्धा त्यात गुंतवणूक करायला लागले.
म्युचुअल फंड हा विषय काही वेळा complex वाटतो. तसेच यात अनेक मतमतांतरेही असतात.
आज 43 म्युचुअल फंड कंपन्यांच्या मिळून शेकडो स्किमस् बाजारात उपलब्ध आहेत. यापैकी काही फंडाची माहिती आपण इथे घेणार आहोत.
म्यचुअल फंडांच्या अनेक प्रकारांपैकी मिडकॅप या प्रकारच्या म्युचुअल फंडात गेली काही वर्षं सगळ्यात जास्त परतावा दिसून येत होता. त्यात गुंतवणूक करणारे सगळे गुंतवणूकदार आनंदी दिसत होते. परंतु या वर्षीचा अर्थसंकल्प सादर झाला आणि हा भांडवली बाजार डळमळला. सहाजिकच सगळ्यांच्या मनात साशंकता निर्माण झाली. आता मार्केट अणखी उतरत जाईल का परत लगेचच वर चढेल हे ठरवणं कठीण वाटू लागलं..
अशा वेळी जर म्युचुअल फंडातील गुंतवणूक ही SIP च्या माध्यमातून असेल तर या अनिश्चिततेच्या काळात आपण निश्चिंत राहू शकतो. मंदीच्या काळात अधिक युनिटस् मिळतात आणि त्याचा फायदा आपल्याला नंतर लक्षात येतो. तसेच हे SIP या वेळी large cap मधे असेल तर बाजाराच्या चढण्या उतरण्याचा परिणाम त्यावर कमी प्रमाणात होतो. म्हणजेच risk कमी होते.
या large cap प्रकारातील एक म्युचुअल फंड स्किम म्हणजे SBI Bluechip fund :
हा फंड 2006 पासून मार्केट मधे आहे. म्हणजे गेली बारा वर्षं हा सातत्यानी चांगला परतावा देत आहे. गेल्या पाच वर्षातील याचा परतावा हा 18% वार्षिक असा आहे. तर गेल्या एक वर्षात त्याने 23% परतावा दिला आहे. या फंडाच्या स्वतःच्या पोर्टफोलियो मध्ये HDFC BANK, L&T, M& M, ITC, Nestle असे उत्तमोत्तम शेअर्स आहेत.
याच्या फंड मॅनेजर श्रीमती सोहिनी अन्दानी या आहेत. गेली काही वर्ष त्यांचं नाव या आघाडीच्या फंड मॅनेजरस् मधे घेतलं गेलं आहे.
म्युचुअल फंडात गुंतवणूक करताना एक गोष्ट लक्षात घ्यावी ती म्हणजे
दीर्घकालासाठी SIP च्या माध्यमातून केलेली गुंतवणूक ही अधिक फायदेशीर ठरते.
अधिक माहितीसाठी संपर्क करा –
-जान्हवी म. साठे
98 204 38 968


