ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, मराठी साहित्यिक, पदमभुषण मा. विष्णु वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून दिनांक २७ फेब्रुवारी हा दिवस ” जागतिक मराठी भाषा गौरव दिन” म्हणून मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनातर्फे विविध उपक्रम राबवले जातात.
त्याच अनुषंगाने दिनांक २६ आणि २७ फेब्रुवारी २०२० रोजी विलेपार्ले पोलीस ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने एक सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे.
“विलेपार्ले पोलीस ठाणे ” तर्फे सन २०१९ मध्ये प्रबोधनकार ठाकरे क्रीडासंकुल, विलेपार्ले (पू ) या ठिकाणी मराठी साहित्यिक, कलाकार यांचा यथोचित सत्कार समारंभ प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास पद्मश्री सौ. पद्मजा फेणाणी , श्री अजित कडकडे ,श्री श्रीधर फडके ,सौ. वैशाली सामंत यांनी बहारदार मराठी भक्तिगीते आणि भावगीते सादर केली होती .या कार्यक्रमास पार्लेकर रहिवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता .
यावर्षी देखील ‘विलेपार्ले पोलीस ठाणे’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक २६ फेब्रुवारी आणि २७ फेब्रुवारी २०२० असे दोन दिवस सायंकाळी ठीक ६. ३० वाजता प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल ,विलेपार्ले (पूर्व) मुंबई या ‘ठिकाणी जागतिक मराठी भाषा गौरव दिन’ हा सोहळा आयोजित केलेला आहे.
आपल्या देशातील ज्ञात, अज्ञात क्रांतिकारकांच्या स्वातंत्र्य संग्रामातील योगदानाची महती अधोरेखित करणारी नाट्यसंपदा कला मंच आयोजित पहिली त्रिस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा- ‘प्रणाम भारत’ या स्पर्धेतील प्रथम आलेल्या खालील प्रमाणे तीन एकांकिकांचे प्रयोग जागतिक मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून दिनांक २६ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ६. ३० ते ९. ३० या दरम्यान प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, विलेपार्ले (पूर्व) ,मुंबई या ठिकाणी आयोजित केलेले आहेत .
एकांकिकांची नावे – १. आद्य क्रांतिकारक – ( क्रांतिवीर उमाजी नाईक ) लेखक ऋषिकेश गोल्हार, औरंगाबाद, दिग्दर्शक डॉक्टर अनिल बांदिवडेकर
२. अमर शहीद – (क्रांतिवीर मदनलाल धिंग्रा) लेखक शिवम मिलिंद पाटील ,औरंगाबाद ,दिग्दर्शक डॉक्टर अनिल बांदिवडेकर ३. मिसींग – (शहीद राजगुरूंवर आधारीत) लेखक शेखर ताम्हाणे, ठाणे ,दिग्दर्शक राजन ताम्हाणे
‘आसरा समूह’ तर्फे महाराष्ट्रातील २० जिल्हा शाळा आणि महाविद्यालयांमधून मराठी शाळा व मराठी संस्कृतीचा प्रचार करण्याच्या दृष्टीने ‘संत वाङ्मय’ या विषयावर विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात त्या स्पर्धेच्या विजेत्यांना वरील कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण समारंभ देखील आयोजित केलेला आहे .
त्याचप्रमाणे दिनांक २७ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ६. ३० ते १०. ०० यादरम्यान श्री. स्वप्निल पंडित यांचा ‘मेघ मल्हार’ वाद्यवृंदांच्या साथीने प्रथितयश आणि सुप्रसिद्ध गायक मराठी गीते सादर करणार आहेत तसेच या कार्यक्रमादरम्यान मराठी साहित्यिक आणि मराठी सिने कलाकार यांचा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे.
Welcome to Town Parle (Online Newspaper of Vile Parle) Stay informed with the Latest News, Events, Updates of Vile Parle Read Expert Articles, Interviews, Tips. Subscribe to our newsletter and receive regular updates & news about Vile Parle directly to your inbox. Sign up now for free!