अखंड भारतदिनाच्या निमित्ताने – फेसबुक लाईव्ह सेशन – 21
जनसेवा समिती, विलेपारले
अखंड भारतदिनाच्या निमित्ताने
फेसबुक लाईव्ह सेशन – 21
मंडळी,
आपण सगळे जाणतो की 15 ऑगस्ट 1947 ह्या दिवशी आपण स्वतंत्र झालो पण देशाची मात्र शकलं झाली. आपला मोठा भाग फाळणीमुळे विलग झाला आणि त्यानंतरच्या युद्धातील शत्रूच्या कपटनितीमुळे पाक व्याप्त काश्मीर, गिलगिट बाल्टिस्तान, अक्ससाई चीन आदी भाग आपण गमावला.
अखंड भारताचे आपलं स्वप्न तेव्हापासून आजतागायत अर्धवटच राहिले आहे.
जनसेवा समिती, विलेपारले गेली अनेक वर्षे स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वरात्री अखंड भारत दिनाची याद म्हणून औचित्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करीत आहे.
सध्याची जागतिक परिस्थीती आता झपाट्याने बदलत आहे. वैश्विक राजकारणात भारताचे महत्वही वाढत आहे. भारताच्या राजकीय महत्वाकांक्षेला तितकेच सक्षम लष्करी पाठबळ मिळत आहे.
सर्जिकल स्ट्राईक्स, कलम 370 रद्द करण्याचा निर्णय, चीन बरोबरील संघर्षात घेतलेली कणखर भूमिका हे सबळ आणि आक्रमक भारताचे द्योतक आहे. ह्या घटनांकडे पाहताना आता आपलं अधुरे राहिलेले अखंड भारताचे स्वप्न अशक्य वाटत नाही.
आणि हाच धागा पकडून यावर्षी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वरात्री अखंड भारताचे स्वप्न किती वास्तव आहे हे जाणून घेण्यासाठी आजचे आघाडीचे, अभ्यासू आणि निर्भीड पत्रकार, लेखक, राजकीय भाष्यकार, विश्लेषक आणि वक्ते, श्री भाऊ तोरसेकर यांना निमंत्रित केले आहे.
अखंड भारत दृष्टिपथात आहे का?
ह्या विषयावर ते आपल्याला लाईव्ह फेसबुक सेशनच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमाचा तपशील असा आहे..
अखंड भारत दृष्टिपथात आहे का?
वक्ते : प्रसिद्ध राजकीय विश्लेषक श्री. भाऊ तोरसेकर
शुक्रवार, दि 14 ऑगस्ट, रात्री ठीक 10 वाजता
सदरहू कार्यक्रम आपल्या संस्थेच्या अधिकृत फेसबुक पेजवरून प्रसारित होणार आहे.
समस्त राष्ट्रप्रेमी नागरिकांना विनंती आहे की त्यानी उपरोक्त दिवशी रात्रौ ठीक 10 वा खालील लिंकवर क्लिक करून मोठया संख्येने सहभागी व्हावे 🙏🙏🙏🙏
https://www.facebook.com/Janaseva-Samiti-JSS-Diaries-1711157715829156/
पोस्टर क्रेडिट : अदिती काजरेकर

