त्रिदशकपूर्ती वर्षारंभ कार्यक्रम -शिवमहोत्सव २०१७
येत्या १८ मार्च २०१७ या दिवशी जनसेवा समिति संस्था ३० व्या वर्षात पदार्पण करीत आहे.कोणत्याही सामाजिक संस्थेसाठी ही निश्चितच ही अभिमानाची घटना आहे.संस्थेच्या त्रिदशकपूर्ती वर्षारंभ आपण मोठ्या दणक्यात साजरा करायचा ठरवला आहे.
अर्थात याचा आरंभ आपण शनिवार दि १८ मार्च २०१७ आणि रविवार दि १९ मार्च २०१७ हे दोन दिवस शिवमहोत्सव-२०१७ या कार्यक्रमाचे आयोजन करून आपण करणार आहोत.या शिवमहोत्सवात खालील कार्यक्रमांचा समावेश असणार आहे.

