पुस्तक परीक्षण – कंबोडियातील अंगकोर वाट आणि परिसर 

डॉक्टर मिलिंद जोशी यांचे तिसरे पुस्तक कंबोडियातील अंगकोर वाट हे  प्रसिद्ध झाले आणि नेहमीच्या पेक्षा वेगळ्या ठिकाणाचे प्रवासवर्णन अनुभवण्यासाठी वाचायला सुरुवात केली.खरंतर आपण बरेचदा युरोपला ,अमेरिकेला जाऊन आलो.  खूप मजा आली, मस्त देश आहेत असं अनेक जणांकडून ऐकतो पण सहसा नेहमीच्या वाटा वेगळ्या करून एखाद्या वेगळ्या ठिकाणाचे दर्शन या पुस्तकात डॉक्टर मिलिंद जोशी यांनी  खूप उत्तम प्रकारे करवले  आहे.
कंबोडिया हा भारताच्या पूर्वेकडील एक देश.  भारताच्या पूर्वेकडे अग्नेय दिशेला ब्रह्मदेश म्हणजेच म्यानमार नंतर थायलंड नंतर कंबोडिया व त्याच्या पुढे व्हिएतनाम अशा क्रमाने देश आहेत.
बाराव्या-  तेराव्या शतकापर्यंत भारतीय संस्कृती इथे नांदत होती.  कलेचा अत्युच्च आविष्कार त्या काळातील मंदिरांच्या बांधकामातील सफाई , कोरीव काम यातून आजही नजरेस पडतो.
अशाच कंबोडियातील जागतिक वारसास्थळ म्हणून मान्यता मिळालेल्या आणि जगातील सर्वात मोठे धार्मिक स्थळ असलेल्या हिंदू मंदिरांचा समूह म्हणजे अंगकोर वाट .
या पुस्तकात त्यांनी कंबोडियातील सियान  रीप  अंगकोर वाट , अंगकोर थॉम , बायॉन,  
बाफुऑन ताप्रोम , बनते स्त्राई  अशा वेगवेगळ्या ठिकाणांची वर्णन इतक्या उत्तम रीतीने  केली आहेत की तिथे  केलेला त्यांचा प्रवास, त्यांनी पाहिलेल्या ,अनुभवलेल्या गोष्टी वाचताना आपण त्यांच्यासोबत या सर्व गोष्टींचा अनुभव प्रत्यक्षात घेत होत असे वाटायला लागते .शिवाय आपल्याला हे सारे प्रत्यक्षात बघायला जायचे असेल तर प्रवासापूर्वी आणि प्रवासादरम्यानची तयारी कोणती  ठिकाणे पाहायला चुकवू नयेत या आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला सहज कळतात.
त्यांच्या लेखनाची खुमासदार शैली आणि मजेशीर प्रसंग वर्णन आणि उत्तम प्रवास वर्णन यामुळे हे पुस्तक आपला खराखुरा कंबोडियातील प्रवास करवतेय असे वाटते.
हे पुस्तक वाचकांसाठी नक्कीच अनुभवांची  शिदोरी ठरेल आणि ते वाचकांना नक्कीच आवडेल.
हे पुस्तक विकत घ्यायचे असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधू शकता. 
डॉ. मिलिंद जोशी 
९८९२०७६०३१
9892076031
 
 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu