म्हंज्ये काय गं आज्जी ? आजी आणि नातवामधील गमतीशीर संवादकथांचे पुस्तक ​प्रकाशित 

“ मराठी इज sooooo बोअरिंग “किंवा 
“मी ममाला  आस्क * करीन. तिने *अलाव केलं तर मग वेन्स्डे ला येईन”
ह्या अशा प्रकारच्या संवादांची आताशा आपल्याला (नाईलाजाने) सवय झाली आहे.
किंवा मग..
“ काय हेऽऽऽ ! मराठी भाषेत किती ही भेसळ !! मराठी मालिकांमध्ये तर भाषेचा उजेडच असतो.पण.. निदान बातम्या देताना तरी भाषेचं भान राखायला नको का ?”
ह्या अशा प्रकारची टीका सर्रास केली जाते. 
एकदा, * मराठी भाषेचं शब्दवैभव उलगडून दाखवायचा आपण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे ? * असा विचार मनात आला नि *शुभस्य शीघ्रम् * म्हणत कामाला लागले. 
*शब्द एक अर्थ अनेक * ह्या संकल्पनेवर आधारित लेखन करायचं ठरवलं नि मनात अनेक शब्दांची गर्दी उसळली. त्यातल्या मोड शब्दाचा पहिला नंबर लागला. नाहीतरी शब्दमहिमा सांगण्याच्या कल्पनेला धुमारे ( म्हणजे मोड हा समानार्थी च की ) फुटल्यामुळेच तर लेखनाला सुरूवात केली होती नं !
आणि….बघता बघता आज्जी-नातवा ची संवाद कथा झाली की तयार !
होय ! सध्या काहिशा विरळ * होत चाललेल्या पण गोड अशा *आज्जी-नातवंडां च्या नात्याला उजाळा देण्याच्या उद्देशानेच पुढच्या सगळ्या कथा लिहाव्या असं मनात ठरवून टाकलं. 
ईश्वरकृपेने अनेक संवाद कथा तयार झाल्या नि त्यांनाच म्हंज्ये काय गं आज्जी ? हे नाव देऊन पुस्तक रूपात बांधलं .
२ मे २०२३ ला प्रकाशन सोहळा झाला नि रसिक वाचकांनी भराभर मागणी नोंदवून पुस्तकाचं भरभरून स्वागत केलं. 
लिहित्या हातांना आणखी काय हवंय हो ?
 हां हां ! पण …आणखी आणखी *मागणी-नोंदणी * मात्र नक्कीच हवेय बर्रका !! 
चला तर मग ! 
*उचला मोबाईल नि संपर्क करा **पुस्तक पोचेल तुमच्या  घरा *

अनुजा बर्वे / अविनाश बर्वे

9820137017/9820137397

ईमेल – neelimabarve@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu