पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचे पार्ल्यात श्री गणपती दर्शन

आज पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांनी विले पार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या शतक महोत्सवी गणेशोत्सवात श्री गणरायाचे दर्शन घेतले व मनोभावे पूजन केले.ऐतेहासिक मूल्य असलेल्या शतक महोत्सवी गणेशोत्सवा निमित्ते लोकमान्य सेवा संघाचे तसेच विले पारल्याच्या सांस्कृतिक समृद्धतेचे त्यांनी विशेष कौतुक केले.याप्रसंगी त्यांच्या सोबत राज्यपाल श्रो भगतसिंग कोशियारी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,परफेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील,मंगल प्रभात लोढा उपस्थित होते.

याप्रसंगी श्री गणरायाच्या दर्शना सोबत त्यांनी लोकमान्य टिळकांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.

तसेच थोर साहित्यिक स्वर्गीय पु.ल.देशपांडे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून लोकमान्य सेवा संघातील पु.ल.गौरव कला दालनात पु.ल.च्या अर्धपुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.याप्रसंगी उपस्थितांना त्यांनी ” या दालनात आलेली मंडळी दिवसातून किती तास हसतात ? “असे विचारत, ” पु.ल.देशपांडे का नाम बोले और हसे नही, तो कैसे चलेगा ” असे उदगार काढत पु.ल.देशपांडेंच्या गुणवैशिष्ट्याचा गौरव केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना या प्रसंगी विले पार्ल्याच्या इतिहासाचे दोनही खंड संस्थे मार्फत तर आमदार पराग अळवणी व नगरसेविका ज्योती अळवणी लिखित तसेच ख्यातनाम चित्रकार सुहास बहुलकर लिखित पुस्तकेही देऊन स्वागत करण्यात आले.याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मुकुंद चितळे,कार्याध्यक्ष उदय तारडाळकर, उद्योजक दीपक घैसास,आमदार पराग अळवणी तसेच पार्ल्यातिल सर्व नगरसिविका सुनीता मेहता व ज्योती अळवणी,नगरसेवक अनिष मकवनी, अभिजित सामंत,मुरजी पटेल व मान्यवर उपस्थित होते.

PC: Lokesh Tardalkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu