पार्ले कट्टा जानेवारी २०२०
अंतराळ मोहिमांची आवश्यकता, भारतातील अंतराळ संशोधनाची व्याप्ती, जागतिक स्तरावर नावाजल्या गेलेल्या मंगलयान, चांद्रयान मोहीमा, आगामी मानवी मंगळ मोहीमा, अंतराळवीरांचा दिनक्रम या सगळ्याविषयी आपल्या मनात उत्सुकता तर असतेच पण याविषयी अनेक प्रश्नही पडत असतात.
आपल्या मनातल्या अशा सगळ्या शंकाचे साध्या सोप्या पद्धतीने निरसन करण्यासाठी ज्येष्ठ अंतराळ शास्त्रज्ञ आणि ‘इस्रो’चे माजी समूह संचालक श्री सुरेश नाईक यांना पार्ले कट्ट्यावर आमंत्रित करण्यात आले आहे.
त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधणार आहे प्रज्ञा काणे.
’इस्रो’मध्ये तब्बल 30 वर्षे कार्यरत असलेले आणि 18 उपग्रह प्रकल्पांचा प्रत्यक्ष अनुभव गाठीशी असलेले श्री नाईक यांचा आगळावेगळा प्रवास जाणून घेणे हा आपल्या सर्वांसाठीच प्रेरणादायी अनुभव ठरेल.
पार्ले कट्ट्यावरील मुख्य मुलाखतीच्या आधी सादर होणाऱ्या मुक्त व्यासपीठालाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. याअंतर्गत साठ्ये कॉलेजच्या ’नाट्यपर्वा’चे विद्यार्थी ’तुमसे ना हो पायेगा’ ही सामाजिक समस्यांवरची नाटिका सादर करतील.
तेव्हा भेटूया नवीन वर्षातील पहिल्या शनिवारी, दि. O4 जानेवारी 2020 रोजी सायंकाळी 5:30 वाजता.
स्थळ – साठे उद्यान, मालवीय – पार्क रोड चौक. शिवसेना शाखेसमोर, विलेपार्ले (पूर्व )


