पार्ले कट्टा 6 जानेवारी 2024
शनिवार दिनांक 6 जानेवारी 2024
नवीन वर्षातील पार्ले कट्टा
नवीन वर्षातील पार्ले कट्टा शनिवार दिनांक ६ जानेवारी २०२४ रोजी आयोजित केला आहे.
या वेळच्या पार्ले कट्ट्याचे प्रमुख पाहुणे आहेत जागतिक कीर्तीचे मेंदू व मज्जारज्जू शल्य विशेषज्ञ, डॉ. महेश करंदीकर.
नॅशनल इंडियन मेडिकल असोसिएशनने मानद प्रोफेसर म्हणून सन्मानित केलेल्या डॉ. करंदीकरांनी संगणकाच्या सहाय्याने मेंदू शस्त्रक्रिया आणि न्यूरो एंडोस्कोपी या अत्याधुनिक शस्त्रक्रियांमध्ये विशेष प्राविण्य संपादन केलेले आहे.
ज्येष्ठांमध्ये सर्वसाधारणपणे आढळून येणारे विकार, त्यावरील उपचार, प्रतिबंधात्मक उपाय तसेच युवा पिढीने घ्यायची काळजी, अध्यात्माचे वैद्यक शास्त्रातील महत्त्व अशा अनेक विषयांवर डॉक्टर माहितीपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत. भारतीय तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक व ‘नाशिक रत्न’ पुरस्काराने सन्मानित डॉक्टर महेश करंदीकर यांना ऐकण्याची संधी पार्ले कट्ट्याच्या निमित्ताने चालून आली आहे.
त्यांच्याशी संवाद साधणार आहेत डॉ. अनुया पालकर.
मुलाखतीच्या आधी मुक्त व्यासपीठात ‘विचारें मना तूंचि शोधूनी पाहे’ विषयावर प्रा. स्वाती वाघ आपले विचार मांडतील.
कार्यक्रम आपल्या नेहमीच्या ठिकाणी म्हणजे.. साठे उद्यान, मालवीय पार्क रस्ता चौक, विलेपार्ले पूर्व होईल.
सर्वांना आग्रहाचे निमंत्रण!
संचालिका – रत्नप्रभा महाजन
सहाय्य- पार्ले कट्टा समिती
सौजन्य- सावली चॅरिटेबल ट्रस्ट
शनिवार 6 जानेवारी, संध्याकाळी 5.30 वाजता
स्थळ – साठे उद्यान


