पार्ले कट्टा दशकपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने -पार्ले कट्ट्यावर जागर लोककलेचा
विलेपार्ले येथील पार्ले कट्टा या उपक्रमाच्या दशकपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने एका आनंद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक जाणिवेचे भान असलेले अभिनेते सयाजी शिंदे यांचा आजवरचा प्रवास दस्तुरखुद्द त्यांच्या कडूनच ऐकता येणार आहे. तसेच कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्राध्यापक राष्ट्रपती पुरस्कार विजेते कलाकार योगेश चिकटगावकर ‘जागर लोककलेचा ‘ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. गण , गौळण , अभंग , भारूड , पोवाडा , लावणी आदी लोककलांचा अविष्कार पाहायला मिळणार आहे. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमासाठी सगळ्यांना विनामूल्य प्रवेश असून विनामूल्य प्रवेशिका नाट्यगृहात मिळू शकतील.
दिनांक – ५ जानेवारी , रात्री ८ वाजता
स्थळ : दीनानाथ नाट्यगृह , विलेपार्ले (पु.)


