पार्ले कट्ट्यावर यजुर्वेन्द्र महाजन
फेब्रुवारी महिन्याच्या पार्ले कट्ट्याचे मान्यवर पाहुणे आहेत जळगाव येथील दीपस्तंभ फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेचे सर्वेसर्वा श्री. यजुर्वेन्द्र महाजन.
दिव्यांग, प्रज्ञाचक्षु तसेच मागासलेल्या भागातील गरीब मुलांना स्पर्धा परीक्षांसाठी तयार करून आपल्या पायावर खंबीरपणे उभे राहण्यास सर्वतोपरी साहाय्य करणारी ही देशातील एकमेव संस्था.
या संस्थेविषयी आणि इतर अनेक उपक्रमांविषयी श्री. महाजन यांच्याशी संवाद साधतील प्रा.छाया पिंगे.
मुक्त व्यासपीठामध्ये श्रीमती वसुधा फाटक रंगछटा कीर्तनाच्या या कार्यक्रमातून कीर्तन ही संकल्पनाआणि त्यातील विविध पद्यप्रकारांची झलक सादर करतील.
दिवस – शनिवार, दि. 2 फेब्रुवारी 2019
वेळ – सायं.5.30
स्थळ – साठे उद्यान, शिवसेना शाखेसमोर, मालवीय व पार्क रोड चौक, विलेपार्ले पूर्व.
सर्वांना हार्दिक निमंत्रण.


