शनिवारी पार्ले कट्ट्यावर बेला शेंडे

अवघ्या सोळाव्या वर्षी हिंदी सारेगमप जिंकणारी स्पर्धक ते पार्श्वगायनाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारी आघाडीची गायिका असा यशस्वी प्रवास करणारी गुणी कलाकार म्हणजे बेला शेंडे.
मधूर आवाजाबरोबरच प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे वरदान लाभलेल्या या गायिकेने आजवर मराठीतल्या आघाडीच्या संगीतकारांबरोबरच हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील इलियाराजा, ए.आर.रेहमान, शंकर एहसान लॉय यासारख्या दिगज्जांसाठी अनेक गाणी गायली.
’जोधा अकबर’मधील मनमोहना सारखे भजन असो, ’नटरंग’ मधील वाजले की बारासारखी लावणी असो, ’मुंबई पुणे मुंबई’मधील ’का कळेना’ सारखे रोमॅंटिक गाणे असो की मराठीतले पहिले ब्रेथलेस गाणे, बेलाच्या सर्वच गाण्यांना संगीतप्रेमींची मनसोक्त दाद मिळाली आहे. 
नवीन वर्षाच्या पहिल्याच शनिवारी या लोकप्रिय गायिकेला प्रत्यक्ष भेटण्याची व तिच्या कारकिर्दीतील सुरेल अनुभव ऐकण्याची संधी पार्ले कट्ट्याने उपलब्ध करून दिली आहे.
बेलाशी मनमोकळा संवाद साधणार आहे चित्रा वाघ.
मुक्त व्यासपीठामध्ये अंधांसाठी कार्यरत असणाऱ्या ’स्नेहांकित हेल्पलाईन’च्या प्रमुख व सेवाभावी कार्यकर्त्या श्रीमती.परिमला भट* आपले मनोगत सादर करतील.
दिवस – शनिवार, दि. 5जानेवारी 2019.
वेळ – सायं.5.30
स्थळ – साठे उद्यान, शिवसेना शाखेसमोर, मालवीय व पार्क रोड चौक, विलेपार्ले पूर्व.
सर्वांना हार्दिक निमंत्रण.

Main Menu