4 नोव्हेंबर- पार्ले – कट्टा
पावसाळ्याच्या विश्रांतीनंतर पार्लेकट्ट्याचे अकरावे सत्र सुरू होत आहे. या पाहिल्याच कार्यक्रमात आपल्या भेटीस येत आहेत *ख्यातनाम वकिल श्री. उज्ज्वल निकम. त्यांच्याशी संवाद साधतील सह्याद्री वाहिनीवरील सुपरिचित निवेदिका श्रीमती शिबानी जोशी
1993, 2003, 2008 चे मुंबईवरील दहशतवादी हल्ले, खैरलांजी हत्याकांड, गुलशन कुमार, प्रमोद महाजन खूनखटला अशा अनेक बहुचर्चित आणि अतिमहत्त्वाच्या केसेसमध्ये सरकारी वकील या नात्याने समर्थपणे जबाबदारी पेललेल्या व्यक्तिकडून त्याचे अनुभव, विचार प्रत्यक्ष ऐकण्याची संधी पार्लेकरांना चालून आली आहे, त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा.
यावेळच्या मुक्त व्यासपीठातील कार्यक्रमदेखील विशेष आहे. अध्यात्माच्या नावाखाली फसवणूक, बुवाबाजी, मानसिक असुरक्षितता यासंबंधी निरनिराळ्या घटना सर्वत्र आढळत आहेत. या अनुषंगाने *सुप्रसिद्ध मानसरोग तज्ज्ञ डॉ. आशिष देशपांडे* ‘माणूस बुवाबाजीच्या मागे का लागतो’ या विषयावर आपले विचार मांडतील.
तेव्हा शनि. दि. 4 नोव्हेंबर रोजी सायं ठीक ५.३० वाजता जरूर या.
स्थळ – साठे उद्यान, पार्क रोड-मालवीय रोड चौक, विलेपार्ले (पू)


