पाटिवि कुटुंबासाठी अनोखी स्पर्धा-”आम्ही १००”
यावर्षी आपल्या पार्ले टिळक शाळेने १०० व्या वर्षात पदार्पण केले. शाळेने या शंभर वर्षात विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडवल्या. “पिढ्यानपिढ्या आमच्या कुटुंबातले सर्व जण याच शाळेत शिकलो” असे अभिमानाने सांगणारी अनेक कुटुंबे पार्ल्याच्या पंचक्रोशीत आढळतात. अश्या पा.टि. वि. कुटुंबांसाठी एक आगळी वेगळी स्पर्धा आयोजित केली आहे-“आम्ही शंभर”.या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुमच्या कुटुंबातील सर्व पिढ्यातील सर्व सदस्यांची मिळून शाळेतील विद्यार्थीदशेतील एकूण वर्षांची बेरीज १०० किंवा अधिक असणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. ही स्पर्धा केवळ पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यम शाळेतील आजी माजी विद्यार्थ्यांसाठीच आहे.
सर्व पात्र प्रवेशिकांची यथोचित दखल घेतली जाईल.
पा.टि.वि. कुटुंब “आम्ही १००” स्पर्धेसाठी नवे नियम –
१) कुटुंब प्रमुख म्हणून आई अथवा वडील हे दोघेही किंवा यापैकी किमान एकजण पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यम या शाळेचा माजी विद्यार्थी असावा.(हयात असो व नसो ) तसेच तो किंवा ती त्या कुटुंबातील पा.टि.वि.मराठी शाळेचा पहिला विद्यार्थी / विद्यार्थिनी असावा.
२) कुटुंब प्रमुखाची सख्खी भावंडे (हयात असो व नसो ) पा.टि.वि.मराठी शाळेचे माजी विद्यार्थी असावेत.
३) त्यानंतर पुढल्या पिढीतील त्यांची मुले किंवा मुली हे सर्व जण त्याच शाळेचे माजी विद्यार्थी हवेत.
४) त्यानंतरच्या पिढीतील त्यांची नातवंडे हे सर्व जण पा.टि.वि. मराठी माध्यम शाळेचे माजी / आजी विद्यार्थी हवेत.
५)कुटुंबप्रमुख आई, वडील, त्यांची मुले किंवा मुली व नातवंडे, कुटुंब प्रमुखाची सख्खी भावंडे त्यांची मुले, मुली व नातवंडे यांची विद्यार्थीदशेतील पा.टि.वि.मराठी शाळेतील वर्षे एकत्रित करून ती कमीत कमी शंभर असावीत.स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी ही महत्वाची अट आहे.
६) वरील सर्वांची पूर्ण नावे, अकरावी / दहावी उत्तीर्ण केले ते वर्ष वरीलप्रमाणे लिहून पाठवावेत .
७) वरील कुटुंबसदस्यांपैकी कुणी शालेय जीवनात काही विशेष प्राविण्य / पारितोषिक इ. प्राप्त केले असल्यास ते ही नमूद करावे.
८ ) या कुटुंबाने सर्वांच्या आठवणी एकत्रित करून एकच लेख पाठवावा. कमाल दोन पाने.- लेख लिहिणे ऐच्छिक आहे.
अधिक माहिती साठी दूरध्वनी क्रमांक ०२२-२६११६६४५ वर सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत संपर्क साधावा.
For More Details visit :
Google form for ”आम्ही १००” स्पर्धा

