पा.टि.वि. मराठी माध्यमाच्या पाचवीतल्या विदयार्थ्यांची नेत्रदीपक कामगिरी
पा.टि.वि.च्या पाचवीतल्या विदयार्थ्यांची नेत्रदीपक कामगिरी
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिळवले भरघोस यश !
‘रिवाईल्ड इन्स्टिट्यूट ‘ यांनी ‘ ‘ ‘युरोपियन वाइल्डरनेस सोसायटी’ यांच्या सहकार्याने, दिनांक 16 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर 2020 या कालावधीत ‘वन्यजीवन सप्ताह’ साजरा करण्यासाठी व्हिएन्ना ( ऑस्ट्रिया) येथे आंतरराष्ट्रीय वन्यजीवन परिषद आयोजित केली होती.
या परिषदेत नॅचरल फॉरेस्ट व बायोडायव्हर्सिटी या विषयावर आंतरराष्ट्रीय ऑनलाईन प्रेझेंटेशन व वर्कशॉप आयोजित केले गेले ज्यामध्ये आशिया, आफ्रिका ,ऑस्ट्रेलिया ,युरोप , उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका या सहा खंडातील तीस देशांमधील तीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सादरीकरणाच्या परीक्षणासाठी 30 देशांमधील 54 संशोधक सहभागी झाले होते. जगभरातील 15000 दर्शकांनी ही परिषद पाहिली.
या परिषदेमध्ये आपल्या पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यमातील अथर्व धासरे ,श्रेया पेटावे ,कौशिक गावडे ,केतन पाटील या विद्यार्थ्यांनी श्री महेश संजगिरी सर (आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी) व सौ छाया गाडे बाई( प्राथमिक शाळेतील निवृत्त मुख्याध्यापिका )यांच्या मार्गदर्शनाखाली भाग घेतला होता. या परिषदेमध्ये अथर्व सुधीर धासरे (5/4 ) या विद्यार्थ्यांची उत्कृष्ट सादरकर्ता विद्यार्थी (5 वी ते7 वी गट )म्हणून निवड झाली आहे. त्याच प्रमाणे त्याच्या प्रकल्पाची उत्कृष्ट तयार केलेला प्रकल्प म्हणून निवड झाली आहे.
तसेच श्रेया सुरेंद्र पेटावे ( 5/4 ) या विद्यार्थिनीच्या प्रकल्पाची उत्कृष्ट रचनात्मक प्रकल्प म्हणून निवड झाली आहे.
केतन पाटील ( 5/1 )या विद्यार्थ्याचा प्रकल्प उत्कृष्ट प्रकल्प म्हणून निवडला गेला आहे.





